नवीन लेखन...

जीवन आहे एक कल्पवृक्ष

जीवन आहे एक कल्पतरु

मिळेल ते, जे विचार करुं

ही आहे सुवर्ण माती

उगवेल ते, जसे पेरती   ।।१।।

राग लोभ अहंकार

मोठेपण भासविणार

दाखवूनी क्षणिक सुख

देई पर्वतमय दुःख   ।।२।।

दया क्षमा शांति

उच्च भावना असती

बिंबता हे सद् गुण

लाभेल खरे समाधान   ।।३।।

घाणीच्या राशी पडती

निराशा व दुःखची वसती

स्वच्छता व निर्मळ घर

तेच सर्व सुखांचे माहेर   ।।४।।

आपला आपण चालक

कर्म फळाचा मालक

सुख दुःखे येती

तेचि आपली निर्मिती   ।।५।।

प्रयत्न सारे तुमचे हातीं

श्रद्धा ठेवावी ईश्वरावरती

योग्य करितां प्रयत्न

यशाचे मिळेल रत्न   ।।६।।

जेथे प्रसन्न वातावरण

तेथे ईश्वरी आधिष्ठान

समजावे देवूनी लक्ष्य

जीवन आहे एक कल्पवृक्ष   ।।७।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1959 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..