नवीन लेखन...

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी

 

मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी  यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला.

जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव. जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका त्यांना साकारायला मिळाली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच. जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला.

कॉलेज शिक्षणा नंतर १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी लागली. नाटकात कामे करण्याची हौस असल्याने १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या बरोबरच ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला. चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम कुलकर्णी या समीकरणानेच प्रत्येक जण माझ्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या.

पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ हेमा कुलकर्णी, तर त्यांचा एक मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून होत.

जयराम कुलकर्णी यांचे १७ मार्च २०२० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 3837 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..