जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी

जगाची ही रीत ,  कशी समजत नाही ..१,

सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले

आपण बरे नि काम बरे,  तत्व अंगीकारले…२,

मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला

दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३,

जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला

आगळी धडपड करूनी,  यश मिळाले मला….४,

मिसळत होतो सर्वामध्ये,  अतिशय प्रेमानी

तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द ,  माझ्याच कानानी..५,

व्यक्ती तितक्या प्रकृती , असती येथे

भिन्नतेचे स्वभाव तेंव्हा ,  निराशा मनी आणते ..६,

चित्ती येईल तसेच करावे,  जागृत भाव ठेवून

इजा न होईल इतर जनाना,  हे लक्षात घेवून…७

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1763 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…