जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।।

ढग काळे काळे
जमवितोस सगळे
गर्जती वादळे
कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।।

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार
तळपते ऊन
दग्ध होई जीवन
जाई वाळून
तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।।

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार
कड्याक्याची थंडी
भरुनी हुडहुडी
देहाला सिकूडी
गारठूनी जाती,  ज्याना नसे घर   ।।३।।

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार
सुख तुंची देतो
दुःख तूंची देतो
लक्ष्य तूं वेधतो
चमत्काराविणा कसे,  आस्तित्व भासणार   ।।४।।

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1585 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…