आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयन’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात पहा कोणते आहेत हे घटक…

१) पालक –

पालकचा तुमच्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमुळे रक्तातील ‘आयन’ (लोह) वाढवण्यास मदत करते . सुप्स , भाजी ,पालक वडे , आमटी किंवा सलाड अशा कोणत्याही स्वरूपात पालक खाणे हितावह आहे. पालकवर लिंबू पिळल्याने त्यातील आयन (लोह) अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण होते.

२) संत्र –

संत्र्यामधील व्हिटामिन सी आणि व्हिटामिन बी ६ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते . रोज किमान २ ग्लास संत्र्याचा रस प्या मात्र त्यात साखर टाकू नका.

3) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ –

आहारात नियमित किमान ग्लासभर दुध व दुग्धजन्य पदार्थ असणं फार महत्त्वाचे आहे. दुधात शरीराला पूरक अनेक ‘मिनरल्स’( खनिजं )व ‘व्हिटामिन्स’ असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

4) खजूर

काळा आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध आहे. खजूर हे आयन (लोह) प्रमाणेच ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता .

5) गूळ –

भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो .आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते. गूळ लोह्वर्धक असून उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि त्वरित उर्जा मिळते . दररोजच्या जेवणात साखरेऐवजी गूळ वापरणे अधिक हितावह आहे.

6) डाळींब –

शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच सौदर्य खुलवण्यासाठी डाळींबाचा प्रामुख्याने आहारात वापर केला जातो. डाळींबातील लोह्वर्धक व मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी चे प्रमाण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. आठवड्यातून तीन ते चार वेळेस डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल .

7) फरसबी

प्रोटीन, कॅल्शियम, आयन (लोह), सल्फर (गंधक), फॉस्फरस तसंच व्हिटामिन ‘ए’ असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामधील फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. फरसबीची भाजी अथवा कोशिंबिरीत फरसबीचा वापर आठवड्यातून दोनदा केल्याने तुमचे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहील.

8) मांसाहार –

शाकाहाराबरोबरीने मांसाहारानेदेखील तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते . चिकन , मटण , अंडी , मासे यामधील व्हिटामिन ‘बी १२’ व व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. मात्र मांसाहार करताना ते योग्य प्रकारे शिजवा व योग्य प्रमाणात खा .

9) पिस्ता –

सुक्या मेव्यात व्हिटामिन ‘बी ६’ चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषतः ‘पिस्ता’ सर्वाधिक प्रमाणात शरीराला व्हिटामिन पुरवते. त्यामुळे लाडू , शिरा ,हलवा खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर वाढवा. पिस्त्यातील व्हिटामिन ‘बी ६’ रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात.

10) गरम मसाला –

भारतीय खाद्यसंस्कृतीचे खरे वैभव आहे यामध्ये वापरले जाणारे ‘मसाले’ ! तुमच्या जेवणात तमालपत्र , कोथिंबीर , पुदिना , तुळशीची पाने यांचा योग्य वापर ठेवा . हे मसाले आहारातील ‘लोह’ योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.

-आरोग्य धनसंपदा

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…