नवीन लेखन...

नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय

History Museum at Nashik

प्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिसर्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास‍ मिळणार आहे.. महापालिका , केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून जून्या पंपिंग स्टेशनच्या जागेत संग्रहालयाची उभारणी करण्यात आली असून नुकतेच नाशिकच्या इतिहास संग्रहालयाचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांची हस्ते संपन्न झाले.

अश्मयुगातील रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पौराणिक नाशिक, सातवाहन काळापासून मोगल, ब्रिटीशांच्या काळातील नाशिक ते आज प्रगतीकडे झेप घेणारे नाशिक शहर आणि जिल्हयाचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न साकार होत असून अशा प्रकारचे एका शहराचा समग्र इतिहास दाखविणारे हे देशातील पहिले संग्रहालय आहे.

नाशिकच्या अस्तिवात प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत कार्यरत आहे. संग्रहालयाकरिता नाशिकच्या इतिहासाचे उत्खनन करुन अनेक काळातील नाशिकचा शोध घेण्यात आले आहे.दोन लाख वर्षापासूनचा त्रोटक इतिहास असला तरी येथे त्याचा त्रोटक संदर्भ घेवून प्रत्यक्षात ६० हजार वर्षापूर्वीचे पुरावे देखील प्रतिकात्मक स्वरुपात मांडण्यात आले आहे.

या सा-यांचा इतिहास संग्रहालयात आढळेल. या शिवाय ६० आसनी छोटा रंगमंच असून तेथे नाशिकच्या इतिहासाची माहिती देणारे अर्धातासाचे चार लघुपट दाखविण्याची व्यवस्था आहे. श्री व्यास रिसर्च सेंटरच्या वतीने हे संशोधन, संकलन करुन संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती दिनेश वैदय , देवेंद्र कापडणीस, अनिता जोशी यांनी दिली. १ कोटी ६७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात पोस्टर्स, प्रतिकृती, पोथ्या, हस्तिलिखिते, छायाचित्रे, भांडी, शस्त्रे , म्युरल्स या माध्ययमातून हा इतिहास साकारण्यात येत आहे.

नाशिकचा रंजक इतिहास

• मुंबई आग्रारोड भारत आणि रोम यांच्यातील व्यापार मार्ग,
• राघोबादादांच्या काळात नाशिकमध्ये मराठा चित्रशैली अस्तित्वात आली.
• इंग्रजांनी तत्कालीन महाराष्ट्र जिंकला परंतु नाशिक जिंकण्यास एक महिना विलंब झाला.
• वरी, पिवळा , वासुदेव, सहदेव –भाडळी या नाशिकच्या परंपरा आहे.
• ज्योतिष्यशास्त्राची देखील नाशिककरांना समृध्द परंपरा आहे
• तेलीगल्ली, पगडबंद लन ही बलुतदर पध्दतीमुळे पडलेली नावे.
• गोवर्धनगाव होते धागा निर्मितीचे ठिकाण.
• अंजेनेरीगाव होते एका राजधानीचे ठिकाण .

संग्रहालयाची वैशिष्ट्ये

या संग्रहालयात ६० हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडण्यात येत आहे. आदिवासीचे वादय, पोशाख, वासुदेव, नंदी, वीर, पिंगळा यांची मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात येत आहे. नाशिक मधील हस्तलिखित भांडार, गणितापासून ते धर्मशास्त्रापर्यंतचे विषय, सात कालखंडात नाशिकचे बदलत गेलेली नावे. नाशिकचे रस्ते व त्यासंबंधीची बलुतेदारी, गल्ल्यांची नावे, प्रदर्शित करण्यात येत आहे. छायाचित्रांच्या माध्यमातून नाशिकचा इतिहास सादर करण्यात येत आहे.

या संग्रहालयात १२७ पिच्चर्स फ्रेम ,३५ मूर्ती, १७६ माहिती फ्रेम ,१८० नाणी, तलवार तसेच १४ पेटींग्ज लावण्यात आल्या आहेत.

ऐतिहासिक माहिती जाणून घेणा-या इतिहास प्रेमींना या संग्राहालयाचा मोठया प्रमाणात फायदा होवून इतिहास प्रेमींना ही उत्तम मेजवानी आहे. तेव्हा इतिहास प्रेमींना नागरीकांनी आवश्यक या संग्रहालयास भेट दयावीच ….

— अशोक साळी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक
मंगळवार, ५ जुन, २०१२
(‘महान्यूज’ मधून साभार)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..