नवीन लेखन...

गुरुद्रोणाचार्य : कोचिंग क्लासेस आणि एकलव्य

हस्तिनापूरचे गुरुकुल त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षण संस्था होती. हे विशाल गुरुकुल फक्त देशी-विदेशी राजकुमारांसाठी राखीव होते. गुरुकुलात सकाळी भाषागणितधर्मशास्त्रअर्थशास्त्रन्यायव्यवस्थाराजकारण इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जात असे. दुपारनंतर गुरुकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर अस्त्र-शस्त्रांचे कठोर प्रशिक्षण राजकुमारांना दिले जात असे. गुरुकुलाच्या काही अंतरावर धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र होते. त्या केंद्राचे प्रमुख आचार्य गुरु द्रोणाचार्य होते. हस्तिनापूर राज्याकडून त्यांना मान-सन्मानासह उत्तम वेतन मिळत होते. राजकुमारांना शिकवली जाणारी गूढ विद्या इतर कुणालाही शिकवायची नाहीही अट होती. खासगी शिकवणी घेण्यास त्यांच्यावर बंदी होती.

गुरु द्रोणाचार्य आतून अत्यंत चतुर होते. त्यांचे मेहुणे कृपाचार्य सकाळी धनुर्विद्येचे प्रशिक्षण द्यायचेपण प्रत्यक्षात द्रोणाचार्य सर्वांना प्रशिक्षण देत असत. त्यासाठी महिन्याकाठी मोठी गुरुदक्षिणा त्यांना मिळत असे. निषादराज हिरण्यधनूचा पुत्र एकलव्य हा कृपाचार्यांचा शिष्य होता.

हस्तिनापूर राज्यात दर चार वर्षांनी युद्धशस्त्रकलेची प्रतियोगिता होत असे. ही प्रतियोगिता सर्वांसाठी खुली होती. प्रथम पुरस्कार लाख सुवर्णमुद्रा होतापण उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांनाही अनेक पुरस्कार मिळत असे. याशिवाय भारतखंडातील राजे-महाराजे उत्तम प्रदर्शन करणाऱ्या प्रतियोगींना त्यांच्या राज्यांत नोकरी देत असत. त्यामुळे संपूर्ण भारतखंडातून हजारो प्रतियोगी या स्पर्धेत भाग घेत असत.

एका दिवशी अर्जुनाला वार्ता मिळाली की गुरु द्रोणाचार्य नियमभंग करून राजकुमारांच्या व्यतिरिक्त इतरांना धनुर्विद्येचे गूढ शिकवतात. हस्तिनापूरात अफवा पसरली होती की यावर्षी होणारी धनुर्विद्येची प्रतियोगिता द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य एकलव्य जिंकणार आहे.

अर्जुनाने ही वार्ता युधिष्ठिराला सांगितली. युधिष्ठिराने वेळ न गमावता हस्तिनापूर गुरुकुलाचे प्रमुख भीष्म पितामह यांच्याकडे गुरु द्रोणाचार्यांची तक्रार केली. पितामह भीष्मांनी द्रोणाचार्यांना जाब विचारला. द्रोणाचार्य म्हणाले, “एकलव्य हा माझा शिष्य नाही. मी पहाटे उठून धनुर्विद्येचा सराव करतो. त्यावेळी तिथे कुणीच नसते. कदाचित एकलव्य मला सराव करताना चोरून पाहत असेल.”

भीष्म पितामह म्हणाले, “याचा अर्थ एकलव्य चोरून विद्या ग्रहण करत होता.” विदुर म्हणाले, “पितामहद्रव्यवस्तूजनावरे इत्यादी चोरीसाठी दंड देण्याची व्यवस्था आपल्या कायद्यांत आहे. पण विद्या चोरीसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एकलव्याला आपण दंड देऊ शकत नाही. चोरी गुरु द्रोणाचार्यांच्या विद्येची आहे. त्यांनाच शिक्षा ठरवू द्या.”

द्रोणाचार्य म्हणाले, “त्याने चोरून का होईना माझ्याकडून विद्या शिकली. त्यामुळे आता मी त्याचा गुरु झालो आहे. मी गुरुदक्षिणेत त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागतो.” भीष्म पितामहांनी सहमती दिली. एकलव्याने सहर्ष आपला उजव्या हाताचा अंगठा द्रोणाचार्यांना समर्पित केला. आता द्रोणाचार्य एकलव्याला उघडपणे धनुर्विद्या शिकवू लागले.

काही महिन्यांनी हस्तिनापूरमध्ये धनुर्विद्येची स्पर्धा भरली. भरतखंडातील हजारो स्पर्धकांनी त्यात भाग घेतला. साहजिकच कृपाचार्यांचे शिष्यही त्यात सहभागी झाले. प्रतियोगिता सुरू झाली. कर्णाने शंभर पैकी ९१ गुण मिळविलेतर अर्जुनाने ९२ गुण मिळवून कर्णाला मात दिली. आपणच प्रतियोगिता जिंकूहा विश्वास अर्जुनाला होता. पण एकलव्याने ९५ गुण घेऊन अर्जुनाला मात दिली. सर्वांनी एकलव्याचा जयजयकार केला. अंगठा नसतानाही त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले होते. एक लाख सुवर्णमुद्रा त्याने जिंकली. या क्षणाचा फायदा घेऊन दुर्योधनाने मिठी मारून त्याचे अभिनंदन केले. अर्जुनाला वाटले गुरु द्रोणाचार्याने त्याला दगा दिला आहे. संध्याकाळी अर्जुनाने कृष्णाला विचारले, “अंगठा छाटल्यानंतरही हे कसे शक्य झाले?” कृष्ण म्हणाले, “मित्रातू बाण कसा चालवितोस?” अर्जुन म्हणाला, “मी तर्जनी आणि मधल्या बोटाने बाण पकडतो कारण ही बोटे दोरीला स्थिर पकड देतात आणि सोडताना बाणाची दिशा बिघडत नाही.” कृष्ण हसत म्हणाले, “गुरु द्रोणाचार्यांनी नियमांचे पालन करत ही सर्वांना मूर्ख बनविले. तू स्वतः डोळ्यांनी पाहिले की कृपाचार्यांचे सर्वच शिष्य उत्तम प्रदर्शन करत होते.”

आजही ही सरकारी शाळा असो किंवा महागड्या शाळांमध्ये शिकविणारे उत्तम शिक्षक निजी संस्थांमध्ये भारी भरकम फी घेऊन शिकवितात. तिथे शिक्षण घेणारे अधिकांश विद्यार्थी प्रतियोगी परीक्षेत पास होतात.
 
(काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजर्‍याने मला संगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. त्या शाळेच्या बसेस ही एसी आहेत. तरीही त्याला कोचिंग लावावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. – त्या वरुन सुचलेली कथा)

Avatar
About विवेक पटाईत 202 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..