नवीन लेखन...

गझलचा बादशाह – मदन मोहन

बॉम्बे टोकीजचे भागीदार रायबहादूर चुनीलाल बगदादमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. तिथेच मदन मोहनचा २५ जून १९२४ रोजी जन्म झाला.उपजतच त्यांना संगीताची जांण होती. वडील आपल्या दोस्ताना घरी बोलावत आणि २ वर्ष्याचा मदन मोहनला सांगत “ बेटा आपल्या गाण्याच्या रेकोर्डमधून अमकी रेकोर्ड घेऊन ये.” छोटा मदन अचूक घेऊन येत असे.तो ड्रम सुद्धा वाजवत असे.पुढे इराकला स्वातंत्र्य  मिळाल्यावर ते भारतात चेकवाल या गावी परतले.  रायबहादूर चुनीलाल बॉम्बे टोकीज मध्ये भागीदार झाले.

मदन मोहनने कर्तारसिंग याच्या हाताखाली शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. वडिलांच्या दबावामुळे त्यांना सैन्यात भरती व्हाव लागले.पण त्यांचे मन सैन्यात लागतं नव्हते.म्हणून त्यांनी नोकरी सोडली.१९४६ साली त्यांनी ऑल इंडिया रेडीओ मध्ये नोकरी पत्करली.ज्या हाताने कठोर बंदूक चालवली.त्याच हाताने हार्मोनियमवर हळुवार बोटे फिरवली.लखनौ रेडीओवर त्यांनी भरपूर बेगम अख्तर ऐकली.हे एकच वाक्य पुरेस आहे ते गजलचे बादशाह का झाले.१९४८ साली लता मंगेशकर बरोबर गाणे गायले व आपली बहिण मानले. एस डी बर्मांचे सहायक म्हणून म्हणून काम केले आसू,शहीद, मुनीमजी चित्रपटात छोट्या भूमिकाही केल्या.१९५२ साली त्यांचा विवाह शैला धिंग्रा हिच्याशी  झाला. क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांची पुतणी.

त्यांनी लता मंगेशकरबरोबर उत्तम गाणी केली.किंबहुना मला तर वाटते कि मदन मोहन यांनी लताच्या आवाजाचा जितका सुंदर उपयोग करून घेतला तितका इतर संगीतकारांनी फार कमी करून घेतला.”कदर जाने ना “ हे गाणे ऐकून तर बेगम अख्तर सुद्धा चकित झाल्या फारसे शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसून कसे रागदारीवर गाणे केले.अनपढ ची गाणी ऐकून तर नौशाद म्हणाले होते “मदन तेरे इन गानोपर मेरा पुरा संगीत कुर्बान है “ मदन मोहन उत्कृष्ठ सैपाक बनवत असत खास करून भिंडी मटन.एकदा त्यांनी भिंडी मटन बनवून मन्ना डे यांना जेवायला बोलावले आणि “कौन आया मनके द्वारे”  या गाण्याची रिहर्सल करून घेतली.१९६४ला आलेल्या”वोह कौन थी” चित्रपटासाठी त्यांना अवार्डची खूप अपेक्षा होती.पण ते एका प्रसिद्ध संगीतकाराने विकत घेतले.दिल धुंडता है गाण्यासाठी त्यांनी चाल  बनवली होती ती गुलजारना आवडली नाही.पुढे ती विरझारा मध्ये “तेरेलीये हम है जिये “ गाण्यासाठी वापरली.

त्यांच्या चित्रपटातील गाणी गाजली पण चित्रपट चालले नाहीत. मोठ्या प्रोडक्शनचे चित्रपट मिळाले नाहीत.याचे त्यांनी फार मनाला लाऊन घेतले.सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे कोणत्या संगीतकारांना मदन मोहन बद्दल काय आकस होता देवजाणे पण ते मदन मोहन यांना रेकोर्डिंग स्टुडीओ मिळूच देत नसत.आणि चुकून मिळाला तर ए ग्रेडच्या वादकांना त्या दिवशी बुक करत आणि पैसे देत खा,प्या,मजा करा पण मदन मोहनच्या रेकोर्डिंगला जाऊ नका.मग मदन मोहन यांना बी ग्रेडच्या वादकांना घेऊन रेकोर्डिंग करावे लागे.या सगळ्याचा मदन मोहन यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी नको ती गोष्ट कवटाळली.आणि तिनेच त्यांचा १४ जुलै १९७५ रोजी बळी घेतला.अश्या गजल सम्राटाला सलाम.

— रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..