नवीन लेखन...

गॅलिलिओ

 

दुर्बिणीतून खगोलनिरीक्षण करणारा सर्वात पहिला निरीक्षण म्हणून गॅलिलिओचे नाव जगात परिचित आहे. गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याच्या वडिलांचे नाव व्हिसेन्झो गॅलिलिओ होते व त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच गॅलेलियोला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. गॅलेलियो च्या आईचे नाव गिउलिया अमानती होते. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे.

गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.

त्याच्या प्रत्यक्ष निरीक्षणांवर आधारित अनुमानांमुळे , गॅलिलिओला कोपर्निकसचा ‘ सूर्यकेंद्री विश्वाचा ‘ सिद्धान्त योग्य वाटू लागला . अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने , प्रयोगाधिष्ठित तत्त्वविवेचन करणारा म्हणून , ‘ आधुनिक भौतिकशास्त्राचा जनक ‘ , ‘ आधुनिक खगोलशास्त्राचा जनक ‘ , एवढेच नव्हे तर ‘ आधुनिक विज्ञान युगाचा प्रारंभकर्ता ‘ असे गॅलिलिओला जगभर मानले जाते . खगोल निरीक्षणे करून त्यातून या विश्वाचा अर्थ लावण्याचे काम फार प्राचीन काळापासून अनेकांनी जरी केले होते , तरी , गॅलिलिओनंतर विश्वाच्या आकलनाला फार मोठी कलाटणी मिळाली .

गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला हे त्याचे पहिले संशोधन होते . त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. त्यामुळे त्या प्रयोगाद्वारे त्याला त्याच्या सिद्धांताला खूप आधार मिळायचा. त्यांनी केलेले तिसरे संशोधन असे होते की पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. त्याचा चौथा शोध असा होता की गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले.

सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे आज या प्रकाराला ४०० वर्षे उलटून गेली , तेव्हा कुठे ख्रिश्चन चर्चने ‘ गॅलिलिओला शिक्षा करण्यात आम्ही तेव्हा चूक केली होती आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत ‘ अशी जाहीर माफी मागितली आहे !

आकाशनिरीक्षणाला ४०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २००९ मध्ये आपण सर्वांनी ` आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष ` साजरे केले आहे. याबाबतीत युनेस्कोने ` चला ; विश्व जाणून घेऊ या ` हे या पाच वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पाचे ब्रीदवाक्य ठरवले होते. व त्यानिमित्ताने भारतामध्ये सुद्धा विविध संस्थेने त्यानिमित्त विशेष कार्यक्रम घेतले होते. व हे आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले .

 

Avatar
About अथर्व डोके 15 Articles
लेखक हे विज्ञान दर्पण वरचे मुख्या लेखक आहेत. त्यांचे लेख विविध संकेतस्थळावरती आणि विविध अंकांमध्ये प्रकाशित होतात. लेखक हे विज्ञानातील विविध विषयावरती लिहितात. आपण लेखकाशी माध्यमाद्वारे संपर्क समजू शकता. मोबाईल क्रमांक - ७२७६१३३५११ ई-मेल - atharvadoke40@gamil.com संकेतस्थळ - vidnyandarpan.in.net

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..