नवीन लेखन...

फेब्रुवारी २५ : स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनिअर


२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला.

१९६० आणी ७० च्या दशकात भारतिय फिरकी चौकडी विजयामागुन विजय मिळवुन देत असताना फलंदाजाजवळच्या क्षेत्ररक्षकांचा एक चपळ गट संघात सतत होता. फारुख इंजिनिअर हे या गटाचे केंद्रवर्ती स्थान मानावे लागेल. या गटात एकनाथ सोळकर, अजित वाडेकर, श्रिनिवास वेंकटराघवन, सय्यद अबिद अली अशा दिग्गज क्षेत्ररक्षकांचा समावेश होतो.

१केसांना “वळण” लावणार्‍या ब्रायलक्रिम नावाच्या ब्रँडने फारुखशी जाहिरातिसाठी करार केला होता. डेनिस कॉम्प्टन ह्या इंग्लिश कसोटिपटुला प्रथम असा बहुमान मिळाला होता. तेव्हा इंजिनिअर हा भारताचा कॉम्प्टन ठरतो ! ऐन भरात असलेला फारुख इंजिनिअर होताच तसा लोभसवाणा.

१वयाच्या तेविसाव्या वर्षी कानपुरात इंजिनिअरने कसोटिपदार्पण केले. प्रारम्भकाळात त्याला बुधिसागर कुंदरन ह्या दुसर्‍या यष्टिरक्षकाचे संघातिल जागेसाठी आव्हान होते. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या मालिकेत खेळल्यानंतर वेस्ट इंडिज दौर्‍यावर या दोघांना वाटुन-वाटुन सामने मिळाले. कुंदरन २ सामन्यांमध्ये खेळला तर इंजिनिअर ३. फलंदाजित कुणाचिच कामगिरी चांगली झाली नसली तरी तुलनेत इंजिनिअर बरा खेळला.

११९६३-६४ च्या हंगामात कुंदरनला संघात स्थान मिळाले आणी फलंदाजित चांगली कामगिरी करुनही न्युझिलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत एका कसोटिनंतर पुन्हा इंजिनिअरची संघात वर्णी लागली. नंतर गारफिल्ड सोबर्सच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या संघाविरुद्ध कुंदरनने थरारक ७९ धावा काढल्या आणी नवव्या जोडिसाठी वेंकटराघवनसोबत ९५ धावाही जोडल्या (बॉम्बे, पहिली कसोटी). तरिही तिसर्‍या कसोटिसाठिच्या संघात इंजिनिअरला स्थान मिळाले ! टिका होणे स्वाभाविक होतेच.

१मद्रासमधल्या त्या कसोटित पहिल्या दिवशिच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामिला आला होता आणी सलामिच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ,

दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५. उपाहारापुर्विच्या खेळात कुणाही भारतिय फलंदाजाने त्याआधी एवढ्या धावा काढलेल्या नव्हत्या. (अलिकडे सेहवाग ९९ धावा काढुन – वेस्ट इंडिजविरुद्धच – शतकाच्या जवळ आला होता पण सोबर्सचा संघ तो सोबर्सचाच !)

१उपाहारानंतर १०९ धावांवर अखेर “डिक्रा फारुख” बाद झाला. एक खमक्या सलामिविर-यष्टिरक्षक-फलंदाज आता भारताला गवसला होता ! १९७०-७१ च्या हंगामात गावसकरचा उदय झाला आणी १९७४-७५ च्या हंगामात इंजिनिअर निवृत्त झाला. दरम्यानच्या काळात ह्या दोघांनी प्रत्येक डावात सरासरी ४५ च्या गतिने संघाला सलामी दिलेली होती. ह्यात दोन शतकी सलाम्यांचा समावेश होता.

१९७१ साली भारताने पहिल्याप्रथम इंग्लंडमध्ये कसोटिमालिका जिंकली होती. ओवलवरच्या त्या निर्णायक कसोटित गुंडप्पा विश्वनाथ आणी फारुख इंजिनिअरने विजय समिप आणला होता आणी विश्वनाथ बाद झाल्यानंतरही मोठ्या धैर्याने इंजिनिअर खेळत राहिला होता. विजयानंतर हौशी प्रेक्षकांनी फारुखला खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला पण हा इंजिनिअर फारच भारदस्त असल्याने त्यांना तो नाद सोडुन द्यावा लागला !

१टोनी लुइसच्या नेतृत्वाखाली १९७२-७३ च्या हंगामात भारतात आलेल्या इंग्लिश संघाला नमवुन अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालिल भारतिय संघाने सलग तिसरा मालिकाविजय नोंदविला. ह्या मालिकेत फारुखची कामगिरी अतिशय सुरेख झाली. ४१५ धावा, १२१ सर्वोच्च, तीन अर्धशतके तथा बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखरसारख्यांना यशस्वीपणे घेण्याची कामगिरी.

१पुढच्याच हंगामात इंजिनिअरची कामगिरी खालावली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटित तो दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला. हिच कसोटी त्याची अखेरची ठरली. निवृत्त होताना त्याच्या खाती जमा असलेल्या २६११ कसोटी धावा खास फलंदाज म्हणुन संघात असणार्‍या अजित वाडेकर आणी दिलिप सरदेसाई यांच्यापेक्षा सरस होत्या.

१वर्णद्वेषी धोरणांमुळे दक्षिण आफ्रिकेचा १९७१-७२ च्या हंगामातिल ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्यानंतर गॅरी सोबर्सच्या नेतृत्वाखालिल एक आंतरराष्ट्रिय संघ तिकडे गेला होता. त्या संघात अ‍ॅलन नॉटसारख्या यष्टिरक्षकाला मागे टाकुन इंजिनिअर यष्टिरक्षक म्हणुन निवडला गेला होता आणी ब्रॅडमनने इंजिनिअरवर स्तुतिसुमने उधळली होती. (नोंद म्हणुन – २५ फेब्रुवारी ही डॉन ब्रॅडमन यांची पुण्यतिथी.)

सुनिल गावसकरने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले आहे की नर्मविनोदी शैलित सतत काही ना काही बोलत राहुन फारुख इंजिनिअर आसपासच्या क्षेत्ररक्षकांना ‘सावध’ ठेवित असे. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर : “बोलत का नाहिस? रात्री प्लेबॉय वाचल्यापासुन फारसा बोलत नाहिएस तू !”

२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..