नवीन लेखन...

एक विनंती श्री स्वामी समर्थांना

शैक्षणिक, साहित्य, ललित लेखन,
Article :
स्वामी महाराज… तुमच्या कृपेमुळे २०१८ हे इंग्रजी वर्ष खूप छान गेलं. जशी आई मुलांवर जसे प्रेम करते तसे प्रेम तुम्ही माझ्यावर केले. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या सिद्ध वाक्यप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात. मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडून नाही दिली. गेलेल्या वर्षात तुमच्या कृपेने खूप चांगले अनुभव आले व तुमच्या कृपेने काही असेही अनुभव आले कि त्यातून तुम्ही मला जगायचं कस हे शिकवलं. आलेल्या संकटांना सामना करण्याची ताकद तुम्ही मला दिली. तुम्ही जो मायेचा हात माझ्या पाठीवर फिरवत आहात ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या सुख-दुःखात माझ्या पाठीशी राहिलात त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.
स्वामी महाराज…. एक विनंती आहे, या येणाऱ्या नवीन इंग्रजी वर्षात माझ्याकडून तुमची भरपूर सेवा घडावी. मला तुम्ही ज्या कारणामुळे जन्म दिलाय ती तुमची इच्छा माझ्याकडून पूर्ण व्हावी तसेच जे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात ते माझे आई-वडील भाऊ-बहीण व माझे अन्य नातलग त्यांची सेवा घडावी. माझी इच्छा आहे महाराज कि जे कोणी गरजवंत माझ्याकडे मदत मिळावी या इच्छेने येतील त्यांची इच्छा पूर्ण करण्याची ताकत माझ्यात असावी. जो विश्वास माझ्यावर लोकांनी ठेवला आहे तो कधीही तुटू नये त्यासाठी मला तुमची कृपा हवी आहे. स्वामी महाराज तुम्ही १४ विद्या व ६४ कलांचे माहेर घर आहात. स्वामी महाराज तुम्ही माझे आई-वडील गुरू-बंधू सर्व काही आहात. या येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या ज्ञानाच्या भंडारातुन माझ्यासाठी काही मिळावे व त्याचा सर्वांसाठी उपयोग करता यावा हीच विनंती आणि तुमचे श्री स्वामी समर्थ हे गोड नाव सदैव मुखी राहावे हीच इच्छा.
मी हि माझ्या साधारण शब्दातून केलेली प्रार्थना महाराज मान्य करावी आणि तुमची कृपा माझ्यावर व्हावी.. हीच तुमच्या चरणी नम्र विनंती..
श्री स्वामी समर्थ

– मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..