नवीन लेखन...

ग्रामीण भागातील शैक्षणिक अवस्था

शिक्षण हि काळाची गरज आहे .आज कित्येक बालक या शिक्षणापासून वंचित आहेत ,शिक्षणाच्या वयात हाताला लागलेले काम ,घरातील अपेक्षेचे ओझे, चिमुकल्या वयात मुले या अपेक्षेच्या ओझ्याने पार कोसाडून जातात .आज कित्येक मुल शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती एवढी विपरीत आहे कि शिक्षण नावाचे अक्षरही त्या आईवडिलांना माहित नसते ,अडाणी आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहित नसल्याने त्यांच्या मुलांना देणे हि त्यांना आवश्यक नाही वाटत आणि ज्याना शिक्षणाचे मोल आहे त्या पालकांचे शिक्षणाच्या अवास्तव खर्चापायी मुलांना शिकवायचे स्वप्न स्वप्नच राहून जातात .

एकीकडे शहरीकरण जोमाने वाढत आहे पण आजचा ग्रामीण भागातील शेतकरी, गरीब होतकरू मजूर लोक, तेच मागासलेले आयूष्य जगत आहे .आपण गौरवाने म्हणतो आपल्या देशाने खूप प्रगती केली पण आजही का मंग आपल्या देशातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या का करतो? हा मला आणि माझ्या सारख्या अनेक साधारण व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे .जिथे आपण शिक्षणाचे महत्व सांगत प्रत्येकाला शिक्षण मिळायला हवे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे असे म्हणतो पण त्या तळागाळातील माणसाची मुल का त्यांच्या अधिकारापासून वंचित राहतात याचा विचार मात्र कधीच होत नाही किंवा केलाही जात नाही . साधारण घरातील मुले आजच्या वाढत्या पैशाच्या बाजारात शिक्षणासाठी पैसा आणतील तरी कोठून ?घराच्या एका शान्जेची भाकर मिळवता मिळवता ज्यांच्या तळ हाताची घावे त्यांच्या कष्टाची करुण गाथा सांगून जातील असे होतकरू मुलांचे भविष्य मात्र अधांतरीच राहून जाते .आजची शिक्षणाची परिस्थिती एवढी भयाण आहे कि साधारण लहान मुलाला बालवाडीत आजच्या भाषेत सांगायचे तर convent मध्ये जरी टाकायचे असेल तर लाखाने एकापेक्षा एक खर्चिक संस्था दिसतील ,जेवढी जास्त फी तेवढा जास्त आभिमान असतो या पैश्याने धनाढय असलेल्या पालकांना आनि तेही गौरवाने सांगतात आमच्या मुलाची फी इतकी लाख तितकी लाख भरली म्हणून ,हा खर्च तर असतोच पण ईतर शैक्षणिक वर्गही कुण्या महागळया क्लास्सेसला घालवण्यात येतो .जिथे भाकरीच्या शोधात आमच्या शेतकरी ,मजूर लोकांचे आयुष्य जाते तिथे हा पैसा ते आणणार तरी कोठून ? आजचा ग्रामीण भागातील युवक खूप त्रस्त आहे या साऱ्या बाबीमुळे .त्याला कारणेही तसेच आहेत .ग्रामीण भागात जेमतेम बारावी पर्यंत शिक्षण उपलब्ध असते त्यातही विज्ञान शाखेच्या विद्यार्थांना होणारा त्रास हा खूप असतो तो फक्त जे त्याला सामोरे जातात त्यानाच माहित असते .अचानक मराठीतून आलेले मुल इंग्रजीला पार घाबरून जातात .मनात गणिताची वाटणारी भीती ,आणि बाकीचे कठीण कठीण विषय ग्रामीण भागातील मुलाना कठीण वाटतात .पण समोर जाण्याच्या धैयाने तेही रात्र दिवस करून मेहनत घेतात , कधी काळी शेतात कामाला जाऊन आई बाबांच्या मेहनतीला हातभर लावतात अश्याप्रकारे आमचा ग्रामीण भागातील विध्यार्थी बारावी पास होतो .मग पुढे आणखीच मोठा प्रश्न येऊन उभा राहतो पुढील शिक्षणाचा .कारण कुठेही पदवीला महत्व देऊन नोकरी देण्यात येते .पण पदवी शिक्षणाला लागणारा खर्च त्या गरीब मुलांच्या परीस्तिती बाहेर असतो हि विपरीत स्थिती आहे त्यातही कष्ट करून चुराचुरा झालेले मायबाप पाहून तो युवक वैतागून जातो .शिक्षणाचा न पेलणारा खर्च घरातील जबाबदारी बहिणींचे लग्न त्याला मागलेले हुंड्याचे पैसे ,घरातील दुखणे त्याला लागणारा वैदकीय अमर्याद खर्च ,पाऊस नाही शेतामध्ये पिकं नाही पावसाभावी दुबार पेरणीही करायची वेळ येते अश्या कितीतरी समस्या असतात .ज्याचा विचार करता करता ग्रामीण भागातील विद्यार्थी पैश्स्याच्या चक्रात अडकला जातो .जेव्हा हाताला काम मिळेल तेव्हा घरातील चूल पेटल्या जाते अशी खूप हृद्यद्रावक परिस्थितीमध्ये तो आणखीच गुरफटत चालेला आहे .अश्यावेळी विकृत झालेली मानसिकता मग नाना प्रकारची व्यसने जळली जातात .अश्यातून या युवकांच्या आयुष्याची वाट चुकल्या जाते आणि ते गैरमार्गानला किंवा वाईट मार्गाला जातात .आज गुन्हेगारीचे वाढते प्रमाण याचा जर केंद्र बिंदू पहिला तर बेरोजगारी ,पोटाला लागणाऱ्या भाकरीसाठी निवडलेली वाईट वाट ,शिक्षणाचा अभाव ,वाईट संगत, व्यसनाधीनता अश्या कीतीतरी कारणांचे चक्र दिसेल .या मागचे कारणे हि अनेक असतील पण काही अपवाद युवक मात्र वैतागानेच गुन्हेगारीचे मार्ग निवडतात .ते युवक आजही चांगल्या संधी मिळाली तर त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते .पण आता ह्या साऱ्या बाबी सर्वांनाच गौण वाटतात .माणसाच्या जीवनाला खरा आकार शिक्षणानेच येतो ,शिक्षणाच्या वयात शिक्षण मिळालेच पाहिजे .कारण शिक्षणाने समाजातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊ शकतो आजची शिक्षण व्यवस्था खूप महागली आहे , मुळात हि संकल्पना चुकीची आहे शिक्षण हे स्वस्त असायला हवे ज्यामुळे गरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही .अशी विपरीत परिस्थिती ग्रामीण भागातील मुलांचीच नाही तर शहरी भागातही याची सावली क्षणो क्षणी दिसते ,कारण शहरी भागातील मुलांना बेरोजगारीने तर फारच त्रस्त केले पदवी असतानाही त्यांना नोकरी मिळत नाही .एका शासकीय जागेसाठी शेकडो अर्ज दाखल होतात .हेच नाही त्र्खाज्गी क्षेत्रामध्ये नोकरीसाठी अर्माप पैसे मोजावे लागतात एवढे पैसे आणावे तरी कोठून आधी शिक्षणासाठी धावपळ मग नोकरीसाठी अश्या चक्रात तो लहानापासून ओढल्या जाते .या सर्व प्रश्नाला कसे सोडवले जाईल यासठी सर्वानीच प्रयत्न करायला हवे शिक्षणाच्या वयात हाताला काम न देता वहि पुस्तक असावे ,ग्रामीण भागातील युवा शेतकऱ्याला आधुनिकतेचा वापर करून शेतीला प्रगत केले पाहिजे .भारत हा कृषी प्रधान देश आहे मग सर्वात आधी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारायला हवी .जेव्हा आपला शेतकरी शेतीच्या कर्जापासून कायमचा मुक्त होईल जेव्हा त्याचे मुले अल्प वयात शिक्षण न सोडता शिक्षण घेऊन त्याच्या शिक्षणाचा वापर शेतीच्या प्रगतीसाठी करतील तेव्हा खर्या अर्थाने आपण प्रगती केली असे म्हणू शकणार . शिक्षणाचा खरा हेतू हा पैसा कमावून बंगला गाडी घेऊन एका माणसाने दुसर्या माणसाला कमी लेखण्यासाठी मुळात नसावे तर शिक्षण हे उद्याचा उज्ज्वल समाज घडवणारे असावे ,ज्या मध्ये गरीब श्रीमंतीची दरी नसेल .एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीला कमी लेखण्याचे काम न करता केवळ समाजासाठी काम करेल .

— अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातुर जि अकोला

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

2 Comments on ग्रामीण भागातील शैक्षणिक अवस्था

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..