दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,  या परि अनूभव दुजा कोणता

सत्य समजण्या कामी न येई,  तेथ कुणाची कल्पकता

धगधगणारे अंगारे हे,  जाळती जेथे काळीज

शब्दांचे फुंकार घालूनी,  येईल कधी का समज

मर्मा वरती घाव बसता,  सत्य येते उफाळूनी

चेहऱ्यावरले रंग निराळे,  हलके हलके जाती मिटूनी

त्या दु:खीताला जाणीव असते,  जीवनामधली निराशा कशी

झेप घेवूनी समरस होतो,  इतर जणांच्या काळजाशी

सुख दु:खातील दु:ख आधीक ते,  पदोपदी जे दिसून येई

दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी,  दु:खी अनूभवी धाव घेई

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1710 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…