नवीन लेखन...

डॉ . मानसी आपटे : एक जिद्दी मुलगी

डॉ . मानसी आपटे : पी.एचडी , वेन स्टेट युनिव्हर्सिटी, डेट्रोइड, यु.एस.ए

मार्च २००० च्या शालांत परिक्षेत उत्तम मार्क्स आणि मराठी विषयात मुंबई विभागात सर्वाधिक मार्क्स मिळाले म्हणून मानसी सदानंद आपटे या मुलीचा जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने जिज्ञासा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार केवळ तिला मिळालेल्या गुणांसाठी नव्हता तर परीक्षेच्या काळात दुर्धर आजाराला तोंड देत रुग्णालयात वैद्यकिय सेवा घेत असताना दाखवलेल्या जिद्दीला होता. मानसीने हा जिद्दी स्वभाव तिची आई मीनल आपटे यांच्या कडून घेतला आहे. १९९५ साली सहावीत सरस्वती सेंकडरी स्कूल मध्ये असताना तिच्या गटानी ठाण्यातील ध्वनी प्रदूषणावर संशोधन करून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रकल्प सादर केला होता. ठाण्यात अथवा इतरत्र मुंबई, महाराष्ट्रात ध्वनी प्रदूषणाबद्दल तेवढी जागृत निर्माण झाली नव्हती. अशा काळात ६वीच्या विद्यार्थीनीनी केलेल्या या प्रकल्पाचे महत्व आपल्याला कळून येते. त्यांचा प्रकल्प गोहत्ती इथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवडला गेला होता. त्यानंतर १९९७ साली परत मधल्या सुट्टीतील डबा या विषयावर प्रकल्पात तिने सहभाग घेतला होता. या वर्षी सुद्धा भोपाळ इथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत त्यांच्या गटाची निवड झाली होती. हे दोन्ही प्रकल्प करताना शालेय वयातच सहाजिकच विज्ञान संशोधनाची गोडी तिला लागली. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून विज्ञान संशोधन प्रकल्प कसे करावे याचे खरेखुरे बाळकडू मानसीला आणि तीच्या सहकार्यांना राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या माध्यमातून मिळाले .

शालांत परिक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळाल्यावर साहजिकच मानसीने कला विभागाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु विज्ञानाची रंजकता अनुभवल्यामुळे तिने विज्ञान शाखेत केळकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या विज्ञान संशोधकवृतीला खरा फुलोरा आला तो पदवीसाठी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन राम नारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर विभागाचे प्रमुख प्रा. रवी फडके , प्रा. लीना फडके यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे. या विभागात विज्ञान संशोधनाला पुरक वातावरण होते. या तीन वर्षात लहान मोठ्या प्रकल्पात मानसीचा सहभाग होताच. परंतु फडके सरांच्या ओळखीमुळे खाजगी संशोधन प्रयोगशाळेत काम करण्याचा अनुभवपण मिळाला. तिचा पदवी अभ्यासक्रम केवळ सूक्ष्मजीव शास्त्रावर नव्हता तर जैवजीवशास्त्र तंत्रज्ञानाचा पण त्यात अंतर्भाव होता. सरांच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक जैवतंत्रज्ञानाची ओळख त्यांच्या विद्यार्थ्यांना साहजिकच चांगल्या प्रकारे झाली. पदवी परीक्षेत मानसी सूक्ष्म जीवशास्त्र विषयात विद्यापीठात दुसरी आली. एम.एस.सी करता तिने सूक्ष्मजीवशास्त्र विषय घेऊन बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्रवेश घेतला. अंतिम परिक्षेत पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण पदकाबरोबर तीने अनेक फलोशीप पुरस्काराची मानकरी ठरली. जीआरईची परिक्षा देऊन वेन स्टेट युनिव्हर्सिटी (Wayne State University), डेट्रोइड , यु.एस.ए इथे पी.एच.डी साठी प्रवेश घेतला. पी. एच.डी. चे तिचे मार्गदर्शक प्राध्यापक व्हिक्टोरिया मेलर होत्या. पी.एच.डी ला तिचा जनुकशास्त्रातील विषय अतिशय गुंतागुंतीचा होत

प्राध्यापक डॉ. मेलर यांच्या मार्गदर्शनाखाली केमरांच्या [fruitfly] डीएनएचा अभ्यास करताना मानसीला प्रश्न पडला की आपले लिंग नर वा मादी आहे हे सजीवांमधील प्रत्येक पेशीला जनुकांना कसे कळते व याचे नियमन कोण करते? संशोधन करताना मानसीला काही आश्चर्यजनक निरीक्षणे मिळाली. काहीकेमरांच्या जनुकांमध्ये काही अचानक बदल केले तर फरक फक्त नर केमरांच्या मध्ये त्यांचे परिणाम आढळले परंतु मादी केमरांमध्ये हे बदल झाले नाही. हेटरोक्रोमोटीनबाबत संशोधन करताना असे लक्षात आले की केमरांमधील दर्शनिय वैशिष्ट दाखवणारी जनुके ही लिंग भेद करणारी गुणसूत्रे [क्रोमोझम] नियंत्रित करीत नाही तर याचा संबध हेटरोक्रोमोटीनशी संबधित आहे. हे हेटरोक्रोमोटीन सजीवांमधील नर व मादी पेशींमध्ये वेगवेगळे दर्शविले जाते. हे का व कसे होते याचे उत्तर अजून पर्यंत मिळाले नव्हते. याचे कारण शोधणे हाच मानसीच्या पी.एच.डी चा संशोधनाचा विषय ठरला.

पुढील संशोधनातून केमरांच्या X गुणसूत्राशी संबधित काही विशिष्ट प्रक्रीया आणि तोपोआएसोमरेस (Topoisomerase II) या एन्झाईममधील काही वैशिष्टये तिच्या लक्षात आल्या ज्या अगोदर सिध्द झाल्या नव्हत्या. तो पर्यंत वैज्ञानिक असेच समजत होते की सजीवामधील लिंग भेद हे फक्त एकाच ठरवून न दिलेल्या प्रक्रियेने होते. पण मानसीच्या संसोधनामुळे ही विचारसरणी बदलत आहे. मानसीच्या संसोधनातून असे सिद्ध झाले आहे की केमारे आणि कदाचित माणसामधील काही वंश परंपरागत वैशिष्टये एका दुसऱ्या मार्गाने नियमित होतात जी लिंगभेद ठरविणाऱ्या प्रक्रियेपासून वेगळी असतात. मानसीचे या विषयावरचे दोन पेपर्स पण प्रसिध्द झाले आहेत.

मानसीचे सध्या पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यास डॉ. जुलिया कुपर यांच्या मार्गदर्शनाखाली नेशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये चालू आहे. बुरशीचा एक प्रकार असलेल्या यीस्ट वर ती सध्या संशोधन करीत आहे. तिने आपले संशोधन गुणसूत्राच्या शेवटी असलेल्या घटकावर ज्याला टिलोमिअर वर केंद्रित केले आहे. टिलोमिअर गुणसूत्राचा टोक सांभाळत असल्याने त्यांच्या शिवाय पेशी मरून जातात. म्हणजेच आपले जीवन टिलोमिअवर अवलंबून असते.

मानसी काम करत असलेल्या प्रयोग शाळेत असे सिध्द झाले आहे की टिलोमीअर एन्झाईम नसताना सुद्धा काही पेशी जिंवत राहून शकतात. या पेशींना ‘हाती’ (HAATI) म्हणतात. सध्या मानसी याच ‘हाती’ प्रकारच्या पेशीवर मुलभूत संसोधन करीत आहे. या संशोधनाचा उपयोग पुढे कॅन्सरच्या पेशीच्या सजीवांच्या शरीरात होणारा अमर्याद व अबंधनकारक प्रसार रोखण्यासाठी होऊ शकतो. या मानसीच्या प्रयोग शाळेने काढलेले हे निष्कर्ष जनुकशास्त्रच्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग आहेत असे मत तिच्या रुईया कॉलेजमधील प्राध्यापिका लीना फडके यांनी दिले आहे.
विज्ञानच्या इतिहासातील गेली काही शतके पदार्थ , रसायन, अणू तथा संगणकीय व दूरसंचार शास्त्रांवर संसोधन करण्यात गेली आहेत. या विषयातील संशोधनाने मानवी इतिहासात क्रांती झाली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार २१ वे शतक हे खगोलीयपदार्थविज्ञान व अतीसूक्ष्मजीवशास्त्र व ननो टेक्नॉलॉजीच्या संशोधनाचे आहे. या शतकातील वरील दोन्ही शास्त्र विषयातील संशोधन मानवाच्या पुढच्या प्रगतीची दिशा ठरविणार आहे.

सुरेंद्र दिघे
surendradighe@gmail.com

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 11 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..