नवीन लेखन...

दिव्याची अमावस्या

रविवारी दिव्याची अमावस्या आहे म्हणून आदल्या दिवशी घरातील सगळे दिवे म्हणजे समया. निरांजने. पितळी. तांब्याची. चांदीची घासून पुसून स्वच्छ केली जातात. आणि ज्यांच्या कडे या वस्तू नसतात. ते मातीचे दिवे करुन पुजा करतात. काही ठिकाणी कणकेचे दिवे असतात. या नंतर श्रावणापासून सणवारांची साखळी तयार होते. आणि प्रत्येक वेळी दिव्याची गरज असते म्हणून ती आधीच स्वच्छ धुवून पुसून ठेवतात. बाहेरचे दिवे किती लखलखत असले तरी समयीतील मंद. पवित्र ज्योत एक वेगळाच आनंद देते. नुसताच आनंद नाही तर एक फार मोठे सत्य सांगते. सगळीकडे अंधार झाला की माणसाच्या मनात देखिल नको ते विचार येतात. अधांराची भिती वाटते मन अस्वस्थ होते. आणि एक छोटीशी मिणमिणता दिवा लावला तरी धैर्य येते. आत्मविश्वास वाढतो…
दिवाळीच्या दिवसात अशा अनेक पणत्या लावून सगळीकडे प्रकाशाची आतिषबाजी होते. यातून संस्कार व शिकवण दिली जाते की बाह्य प्रकाशा सारखेच मनातही चांगले विचार असले तर आपणच नव्हे तर संपूर्ण जग प्रकाशमय होते. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटले आहे दुरितांचे तिमिर जावो….
या पेक्षा आणखीन कोणती शिकवण आदर्श आहे? आता कोरोनाच्या काळातही कुठे कुठे कशा कशाचा अंधार झाला आहे त्यातून आपण एवढेच शिकायचे आहे की अंधार घालवायचा आहे तो फक्त एकमेकांच्या मनमनातला. गैरसमज. हेवा दावा. स्पर्धा. लहानमोठा. शिक्षण पैसा. प्रतिष्ठा थोडक्यात मी म्हणजेच सर्वस्व. नैसर्गिक आपत्तीने एका क्षणात होत्याचे नव्हते होते म्हणून आहेत तोवर किमान माणूस म्हणून जगू या व जगवू या. त्या साठी पणती जपून ठेवू या..
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..