नवीन लेखन...

दातासंबंधीचे समज-गैरसमज

दातासंबंधीचे जे समज-गैरसमज दातांच्या डॉक्टरांकडे जाण्यापासून बऱ्याचदा आपण या समज-गैरसमजामुळे परावृत्त होतात. दातांच्या बाबतीतला सर्वात लोकप्रिय गैरसमज जर कुठला असेल तर दात काढल्यानंतर नजर कमी होणे किंवा डोळ्यांची बघण्याची क्षमता कमी होणे हा होय. आणि या बाबतीत लहानथोरांपासून सर्व जनमाणसांत एकवाक्यता आहे. खरं म्हणजे दात काढल्यानंतर डोळ्यांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. याला शास्त्रीय आधार आहे.

दाताला आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी तसेच संवेदनांचे ज्ञान असणारी चेतातंतू किंवा नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही. हा गैरसमज पसरण्याला काही कारणे आहेत. बऱ्याचदा दातांची समस्या आपण प्रौढ वा चाळिशीत असताना होते. (खरं म्हणजे चाळिशीत सर्वच अवयवांची थोडय़ाफार प्रमाणात कुरकुर चालू होते.) त्यातच दात काढल्यानंतर आपल्या मनात असलेल्या गैरसमजामुळे आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासायला जातो. या चाळिशीत इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचीही क्षमता थोडीफार कमी झालेली असतेच (कदाचित यामुळेच चष्म्याला ‘चाळिशी’ असंही काही ठिकाणी म्हणतात.) त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरांनी चष्मा लावायला सांगताच आपण दातांचा काढण्याचा व डोळ्यांचा खराब होण्याचा संबंध लावतो. परंतु शास्त्रीयदृष्टय़ा हे खरे नाही. अगदी लाखात एखादा पेशंट जो वरच्या दातांवर प्रचंड सूज येऊन ती डोळ्यापर्यंत पोहचेपर्यंत जर डॉक्टरांकडे गेला नाही किंवा त्याचे इन्फेक्शन अनियंत्रित होऊन डोळ्यापर्यंत गेले तरच डोळ्यांना इजा होऊ शकते. परंतु हे प्रमाण लाखात एखादा वा त्याहूनही कमी असते. कारण हल्ली सर्वजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात.

दातांबद्दलचा अजून एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन क्लिनिंग केल्यानंतर दात हलतात. हा गैरसमज पसरण्यामागची पाश्र्वभूमी आपण समजून घेऊ या. जेव्हा आपण आपल्या डेंटिस्टकडे दात साफ करण्यासाठी जातो किंवा डेंटिस्ट आपल्याला दात साफ करण्याचा सल्ला देतात तेव्हा दातांमध्ये किंवा हिरडय़ांमध्ये अन्नकण अडकून त्याचा ‘प्लाक’ (एक प्रकारचा छोटासा चिवट दगडासारखा घट्ट पदार्थ) तयार झालेला असतो व तो दातांच्या फटीमध्ये व हिरडी व दात यांमध्ये घट्ट चिकटलेला असतो. त्यामुळे हिरडय़ांना इन्फेक्शन होऊन हिरडय़ांतून/दातांतून रक्त वाहते वा मुखदरुगधीचा त्रास संभवतो. ज्यावेळी डेंटिस्ट आपले दात साफ करतो त्यावेळी हा ‘प्लाक’ काढणे गरजेचे असते. हा प्लाक काढल्यानंतर दात व हिरडी येथे एक प्रकारची जागा तयार होते. त्यामुळे काही काळ आपल्याला दात थोडेसे हलल्यासारखे वाटू शकतात. परंतु ही तात्पुरती जाणीव असते. काही तासांत ती जागा भरून येऊन हिरडी व दात एकमेकांना घट्ट चिकटतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. उलट दातांच्या व हिरडय़ांच्या आरोग्यासाठी वर्षांतून एकदा तरी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दात साफ केल्याने त्यांचे आयुष्य वाढतेच.

प्लाक काढल्यानंतर दातांच्या व हिरडय़ांमध्ये पोकळी भरून येणाऱ्या काळात अति थंड किंवा अति गरम पदार्थ टाळावेत. कारण या काळात दातांच्या व हिरडय़ांच्या मधला भाग संवेदनशील असतो वा जेथे चेतातंतू जास्त उद्दीपित होतात तेथे थंड व गरम पदार्थाने काही काळ दाताला ठणके बसू शकतात. परंतु हाही तात्पुरता बदल असून काही काळाने त्रास जाणवत नाही. शिवाय यात एक फायदा असाही आहे की डेंटिस्टला दात साफ करताना आपला एखादा दात जर किडण्यास सुरुवात झाली असेल तर तो प्राथमिक अवस्थेत ध्यानात येऊन कमी खर्चात व कमी वेळेत तो वाचण्याची शक्यताही असते.

दात साफ करताना एक भीती मनात घर करून असते ती म्हणजे आपले दात झिजतील का किंवा साफ केल्याने पातळ होतील का? हा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे डेंटिस्ट दात अल्ट्रासोनिक स्केलरसारख्या मशीनने साफ करतात.

शिवाय दात साफ केल्यानंतर काही वेळा थंड पाणी व गरम चहा पिताना दात सळसळतात. यातील पहिले कारण प्रथम शोधू. अल्ट्रासोनिक स्केलर हे जरी मशीन असले तरी ते फक्त व्हायब्रेशन या तत्त्वावर काय करते. त्यात दात घासण्याच्या किंवा दात कटिंग करण्याच्या उपकरणाचा समावेश नसतो. फक्त व्हायब्रेशन होऊन दातांमधला फ्लक किंवा डाग काढले जातात. हे अतिशय नाजूक व चांगले मशीन असून यामुळे दातांची व हिरडय़ांची कुठलीही झीज होत नाही. मात्र दुसरे कारण काही प्रमाणात खरे आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4226 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..