दंतमंदीर

भक्तांपर्यत माझ्या डेंटल ट्रिटमेंटची बातमी कशी काय लिक झाली कळायलाच मार्ग नाहीये. मला पुसटशीही कल्पनाही नव्हती की भक्त माझ्या मागावर आहेत आणि शेवटी एक दिवस माझा निजी दंत चिकित्सक दत्तु दातारला त्यांनी माझ्या अपरोक्ष गाठलेच. कसली एवढी भुरळ घातली माहित नाही पण माझ्या डेंटल ट्रीटमेंटची पूर्ण डीटेल्स भक्तांनी, त्याच्याकडुन मिळवली; किती इंप्लांट किती रुट कँनॉल, किती क्राउन, एकुण खर्च, वगैरे, वगैरे.

भक्तांच डेंटिस्टला एकच सांगण होत ” की इतर दातांच काहीही करा पण कोणताही एक दात, शक्यतो सुळा किंवा अक्कलदाढ (जे ईझी पडेल ते) extract करुन आमच्याकडे सुपूर्त करावा. केवळ एका दातासाठी निदर्शन करुन, काळे झेंडे घेउन तुमच्या दारात उपोषणाला बसायला लाउ नका. हवतर ट्रीटमेंटचा पूर्ण खर्च आम्ही करु. ” शेवटी डेंटिस्टही, व्यवसायीक नीतिमत्ता बाजुला ठेवत भक्ताच्या मागणीला बळी पडाला आणि नाईलाजाने उजवा सुळा extract करुन द्यायला तयार झाला. कुतुहलापोटी भक्तांकडे चौकशी केल्यावर त्याला कळल की सोन्याच्या कुपीत माझा दात ठेउन त्यावर एक मंदीर बांधायचा भक्तांचा संकल्प होता.

डेंटिस्ट दातारची ट्यूब लगेच पेटली आणि आपला पेशंट सेलिब्रिटी आहे कळताच प्रसिध्दीझोतात आपणही येउ या इराद्याने त्यानी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला टीप दिली. टीव्हीवर ब्रेकिंग न्युज झळकली. भक्तांनी जल्लोश केला. सीएम अॉफिसपर्यंत खबर पोहोचली. मंदीराच्या कोनशीला समारंभावरुन सत्ताधारी आणि विरोधकात तुंबळ माजली. सर्व वाहिन्यांवर चर्चेला उधाण आले. माझ्या निवासस्थानाला आलेल जत्रेच रुप पोलीसांच्या बंदोबस्तामुळे लष्करी छावणीत पालटल.

भक्तांच शिष्ठमंडळ मला भेटायला आल. संपूर्ण विधीची रुपरेषा मला समजाउन दिली गेली आणि मीही त्यात काही जुजबी बदल सुचवले. डेंटिस्टनी दवाखान्यातुन पेशंटची खुर्ची मागवुन घेतली आणि गुरुजीनी काढलेल्या मुहुर्तावर मांडवाखाली माझा सुळा काढायच ठरल. सुळाच का? तर म्हणे सुळा जमिनीत मुळ धरेल जे मंदीराच्या बांधणीसाठी पोषक ठरेल.

सुळा उपटण्यापूर्वी मला भक्तांनी दोन शब्द बोलण्याची विनंती केली. मी एवढच बोललो की की माझे दुधाचे दात पडत होते तेंव्हा का नाही वेचलेत तुम्ही भक्तांनी? तेंव्हा कुठे गेली होती तुमची भक्ती? बरीच देवळ आतापर्यंत जुनी झाली असती. माझ नशीब दत्तु दातारांच्या संगनमतानी प्रत्येक राज्यांत एक एक देउळ बांधायचा तुमचा विचार नाहीये नाही तर माझ तोंडच रिकाम केल असत तुम्ही लोकांनी!

बरेच भक्तगण गहिवरले, शिष्ठमंडळ पळाले आणि कार्यक्रम संपन्न झाल्याच स्वतः दत्तु दातारनीच जाहिर केल.

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 36 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…