नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

राजमाता जिजाऊ

जिजामाता या राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. […]

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत

सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती. […]

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते. […]

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

१९६४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या शास्त्रींनी अल्पावधीतच भारतीय राजकारणावर आपला ठसा उमटविला. १९६५ च्या पाकशी झालेल्या युद्धात देशास खंबीर नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा उजळून टाकली. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या मंत्राने अवघा देश भारावून गेला. […]

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी

बालमजुरी आणि लहान मुलांची वाहतूक रोखण्याचे उद्दिष्ट ठेवून; तसेच सर्व मुलांना शिक्षण हे ध्येय ठेवून ‘बचपन बचाव संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकामगारांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने रग उत्पादक कंपन्यांमधील बालमजुरांचा समावेश आहे. […]

नाट्यदर्पण रजनी चालवणारे सुधीर दामले

नाट्यदर्पण’चे सुधीर दामले हे त्याकाळी ‘नाट्यदर्पण’ नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी १९७५ साली ‘नाट्यदर्पण रजनी’ सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स’चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या ‘नाट्यदर्पण सन्मानचिन्हां’ना मिळाले होते. […]

ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत

‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे. […]

लेखक निरंजन घाटे

प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत. […]

ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खरे

ग ह खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले, हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री गजानन भास्कर मेहेंदळे, श्रीमती शोभना गोखले ह्यांचा आहे ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतः चा वेगळा ठसा स्वतः च्या कामातुन दाखवला. […]

अभिनेता ओमी वैद्य

अभिनेता ओमी वैद्य यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी युका व्हॅली, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला. ओमी वैद्य यांनी लॉस एंजेलिस काउंटी हायस्कूल फॉर आर्ट्समधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ येथे शिक्षण केले. ओम वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, संपादक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. 3 इडियट्स या चित्रपटासाठी त्यांना स्टार […]

1 93 94 95 96 97 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..