नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अमेरिकन लेखिका पर्ल बक

ईस्ट विंड, वेस्ट विंड ही पर्ल बक यांची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने पर्ल बक यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बक यांनी मांडली होती. १९३२ मध्ये या कादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ मिळाले. […]

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत कारभारी दादोजी कोंडदेव

दादोजींनी देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत. […]

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर

नॅकचे जनक अशी ओळख असलेले डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. […]

भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन

१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले. १९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली.जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते. […]

ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर

रघुनंदन पणशीकर यांनी आपली पहिली व्यावसायिक मैफल १९८४ मध्ये केली होती. त्या वेळी त्यांनी राग भूप सादर केला होता. सिंग बंधूंच्या ‘सूरशृंगार’ या संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना पाऊण तास गाण्याची संधी मिळाली होती. […]

ज्येष्ठ नाट्य- चित्रपट अभिनेत्री वत्सला देशमुख

शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या. […]

पटकथाकार ग. रा. कामत

ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. […]

ज्ञानदीपकार आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद

नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले. […]

अभिनेत्री अभिज्ञा भावे

मुविंग आऊट या वेब सिरीज मधून तिने वेब दुनियेत पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अभिज्ञा भावेच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला. […]

फिनोलेक्सचे उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रल्हाद पी छाब्रिया

भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली. […]

1 72 73 74 75 76 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..