मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया। ‘हम दोनो’ चित्रपटातील या गाण्याच्या ओळीप्रमाणेच प्रत्यक्षातही बिनधास्त जीवन जगणाऱ्या सदाबहार देव आनंद यांची पुण्यतिथी देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. देव आनंद यांना बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या कॉलेज मध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख […]
ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला. तिचे बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान […]
मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी […]
बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील […]
आज ३० नोव्हेंबर..ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांची जयंती. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, […]
आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी. बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा ‘अम्मा’ १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया […]
आज डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची पुण्यतिथी माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या […]
ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन झाले.. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित […]
२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात. प्रिय हेमंत मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की […]
हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ज्ञ होत्या. त्यांचा जन्म १९ मे १९०५ रोजी झाला. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत.त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते. हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्णा मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा […]