वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवुडमध्ये आज त्यांनी त्यांच्या अभिनयाने आपले प्रस्थ निर्माण केले आहे.
चतुरस्त्र बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला बोमन इराणी बॉलिवुडमध्ये फोटोग्राफी करत होते पण त्यांचा कल हा अभिनयाकडे होता. अभिनयक्षेत्रात जाण्याचा ते नेहमीच विचार करत होते. मुन्नाभाई एमबीबीएस हा त्यांचा पहिला चित्रपट या चित्रपटातील काम आवडल्यामुळे निर्मात्यांचे, दिग्दर्शकांकडून अनेक कामे मिळाली. बोमन इराणी हे मा.बलराज सहानी, मा.अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. बोमन इराणी मा.अमिताभ बच्चन यांच्या बद्दल म्हणतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्यांच्यासोबत मी केवळ कामच केले नाही तर भूतनाथ या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्यासोबत मी झळकलो होतो. आपण ज्या व्यक्तिचे चाहते आहोत, त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा, त्यांच्यासोबत पोस्टरवर झळकण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. अनेकवेळा हे सगळे खरे आहे का? मी कोणत्या स्वप्नात तर नाही ना असा मी विचार करतो.
बोमन इराणी यांचे काही चित्रपट
मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोंसला, वक्त, नो एंट्री, थ्री इडियट्स वीर-जारा, मैंने गांधी को नहीं मारा, लक्ष्य, हनीमून ट्रैवल्स प्रा. लि. सॉरी भाई,पेज-3 ,माई वाइफ्ज मर्डर, फरारी की सवारी.
नुकताच मराठीत आलेला ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेत बोमन इराणी यांनी धमाल उडवली आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply