डाळींबाची आकाशझेप
प्रतिकूल परिस्थितीतही माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा. […]
या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..
प्रतिकूल परिस्थितीतही माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा. […]
“आचार्य प्रल्हाद केशव अत्रे” हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.
[…]
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ. त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या संशोधनाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
[…]
महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना ‘गदिमा’ या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे ‘अण्णा’ तर आम्हा नातवंडांचे ‘पपा आजोबा’ अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर….
[…]
गेली काही दिवस बाळासाहेब ठाकरे मृत्यूशी झुंज देत होते. अनेक दिग्गज राजकिय विरोधकांना शमवणारे बाळासाहेब यांच्यापुढे मृत्यूचेही काही चालेना. मृत्यू गयावया करू लागला तेव्हा बाळासाहेबांना मृत्यूची दया आली आणि दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनीटांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्यूस स्वतःला अर्पण केले आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला. […]
रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणांचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात. पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते. || ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||
[…]
मी बँकेत टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. दोन तीन महिने झाले असावेत. एकदा साहेबांनी टाइपिंगला दिलेल्या पत्रात मला व्याकरणाची एक चूक आढळली. मी ती दुरुस्त केली. पत्रावर सही करण्यापूर्वी साहेबांनी मला बोलावून तीच दुरुस्ती चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी does च्या पुढे क्रियापदाला s प्रत्यय लावला होता. मी चटकन म्हणालो, ’साहेब does च्या पुढे मेलं तरी s लागत […]
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली. […]
एक सच्चा सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेख प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवन कथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तुत्वाची ही चरित्र मैफल. […]
बालगंधर्वांच्या गाण्यातील लयची गंमत म्हणजे थिरकवा तर; थिरकवांच्या वाजवण्यातील लालित्य म्हणजे बालगंधर्व ! असे हे थिरकवा बालगंधर्वांनी महाराष्ट्राल दिले तर बालगंधर्वांच्या गुरूनी भास्करबुवा बखल्यांनी ते बालगंधर्वांना दिले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions