नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

संगीतकार रवींद्र जैन

आज ९ ऑक्टोबर आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी जन्म:- २८ फेब्रुवारी १९४४ भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार मा.रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज […]

बॉलिवूडचा बादशहा – राजकुमार

आज ८ आक्टोबर आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या मा.राजकुमार यांची जयंती जन्म: ८ आक्टोबर १९२६ विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी मा.राजकुमार यांची ओळख होती. यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला […]

देवरुख येथील मातृमंदिरच्या मावशी इंदिराबाई हळबे

आज ८ ऑक्टोबर. देवरुख येथील ‘मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ मा.इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी. इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य […]

काश्मिरचा माजीद हुसेन

साधारणत: चार-एक वर्षांपूर्वी कुटुंबासहीत काश्मिरला जाण्याचा योग आला होता. सोबत माझे मित्र श्री. मधू साठे आणि संजय प्रभुघाटे आणि या दोघांच्याही फॅमिली होत्या. एकूण दहा जण होतो आम्ही. तेंव्हा काश्मिरातलं वातावरण आताच्या एवढं खराब नसलं तरी टेन्स होतंच. अंधार पडायच्या आत हाॅटेलवर परतणं तेंव्हाही अनिवार्य होतंच परंतू ती सुचना कोणी गांभिर्याने घेत नव्हतं, आम्हीही घेतली नाही. […]

सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी

आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती हृषिकेश मुखर्जी… भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला. दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’, ‘बावर्ची’, ‘खुबसुरत’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या […]

लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे

गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील “आरवली” हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली…. गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात…. एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा […]

बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद

आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. […]

गानकोकिळा लता मंगेशकर

लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती असलेल्या आणि नसलेल्याही माहितीचा संग्रह.. जन्म – सप्टेंबर २८, इ.स. १९२९ ; इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी) व्यक्तिगत माहिती धर्म हिंदू नागरिकत्व भारतीय मूळ गाव  – मंगेशी, गोवा भाषा – मराठी पारिवारिक माहिती आई – माई मंगेशकर वडील – मास्टर दीनानाथ मंगेशकर बंधू-भगिनी – आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर संगीत साधना गुरू – मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत कारकीर्द पार्श्वगायन, सुगम संगीत कारकिर्दीचा काळ  – इ.स. १९४२ पासून गौरव विशेष […]

मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने

आज २२ सप्टेंबर. पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने  यांची जयंती अनंत माने यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर […]

स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे

आज २२ सप्टेंबर. स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी.  त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५  रोजी झाला. चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात […]

1 365 366 367 368 369 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..