नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती

कविता कृष्णमूर्ती हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, उडत्या चालीची हिंदी गाणी ही गातात. कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८ रोजी झाला. त्या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ […]

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्ये ही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम […]

आग्रा घराण्याचे गायक पं.दिनकर कैकिणी

वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्रथम […]

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की ‘भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ रोजी झाला. “हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल […]

लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी

‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।। असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार मा.राम गणेश गडकरी! बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! मा.राम गणेश गडकरी म्हणजे मराठी […]

जेष्ठ उर्दू शायर, कवी आणि गीतकार नक्श लायलपूरी

सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतामधील गावात नक्श लायलपूरी यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. नक्श लायलपूरी यांचे मूळ नाव जसवंत राय शर्मा असे होते. १९४० च्या दशकात नक्श लायलपूरी हे हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईत आले. १९५२ मध्ये त्यांना पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे ते गीतकार होते. मात्र तब्बल १८ वर्षांनी लायलपूरी यांना प्रसिद्धी […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर

शिल्पा शिरोडकरची बहीण नम्रता, शिल्पा व नम्रताची आजी मीनाक्षी शिरोडकर- त्यांनी त्यांच्या तरुणपणी स्क्रीनवर स्वीमिंग सूट घालून मराठी समाजाला चांगलंच हादरवलं होतं. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९७२ रोजी झाला. सर्वसामान्य स्त्रिया बिकिनीला सरावल्या नसल्या, तरी भारतीय चित्रपटात मात्र बिकिनीचं मुबलक दर्शन घडलं आहे. सर्वप्रथम स्वीमसूट परिधान करण्याचा मान जातो नम्रता शिरोडकरची आजी मीनाक्षी शिरोडकर यांना. त्यांनी ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटात ‘यमुनाजळी […]

चित्रपट निर्माते, लेखक, संपादक विजय आनंद

विजय आनंद यांना गोल्डी म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला. १९५४ साली दिल्ली येथे अखिल भारतीय महाविद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये एक नाटक करण्यात आले. नाटकाचे दिग्दर्शन करणारी आणि नाटकामध्ये दिग्दर्शकाची भूमिका करणारी व्यक्ती एकच होती. दोन्हींसाठी पहिले पारितोषिक पटकावणारे मा.विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. मुंबईत आल्यानंतर विजय आनंद यांनी […]

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन

त्यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले […]

हिंदी चित्रपटातील यशस्वी आणि चर्चेतील अभिनेत्री गीता बाली

जन्म:१९३० गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला […]

1 352 353 354 355 356 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..