बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म१७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर […]
कलकत्ता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यांचा जन्म २७ जून १८३८ रोजी नैनिताल येथे झाला.इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते. १८५७ साली इंग्रज सरकारने ‘गॉड […]
जितेंद्र हे बॉलीवुडचे केवळ एक लोकप्रिय नायक अथवा अभिनेते नाहीत तर त्याचबरोबर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपट यांचे ते निर्माते आहेत. बालाजी टेलेफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स या उद्योगांचे ते अध्यक्ष आहेत. […]
रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९३८ साली, […]
‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली. मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. […]
स्त्रियांना वर्ज्य असणार्या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया. एकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या […]
जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे मा.जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी […]
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात […]
रानारानात गेली बाई शीळ हे मराठीतील भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. ‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. जी.एन. जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. एका कार्यक्रमात […]