नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला.  तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. […]

मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने

रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून संजय मोने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली. टाइम बरा वाईट, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या […]

मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेते रवींद्र मंकणी

‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला. रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘रवींद्र मंकणी’ यांची ‘स्वामी’ या मालिकेत ‘माधवराव पेशवे’ यांची भूमिका […]

नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड

गिरीश कर्नाड म्हटलं की ‘तुघलक’ आणि ‘हयवदन’ ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नड मध्ये करणार्याव या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक […]

गानहिरा हिराबाई बडोदेकर

ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फक्त माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी […]

विजय तेंडुलकर

प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुर येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कारकून होते. शिवाय प्रकाशनाचा छोटासा व्यवसायही ते चालवायचे. ज्या काळात मुलांना खेळण्याशिवाय इतर काही सुचत नसते अशा वयात अर्थात वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. घरात विखुरलेली पुस्तके हे त्यांच्या लेखनाचे […]

जेष्ठ संगीतकार हंसराज बेहल

हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली […]

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

एकाच नावाच्या दोन व्यक्ती असेल तर फार आश्चर्य वाटते. पण जेव्हा एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीसह, प्रेक्षक व मिडीयाची देखील तारांबळ उडते. या दोन व्यक्ती म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर तारका सोनाली कुलकर्णी. या दोघींची ओळख सांगण्यासाठी प्रेक्षकांनी देखील छोटी सोनाली-मोठी सोनाली, सीनिअर सोनाली-ज्युनिअर सोनाली, अप्सरावाली सोनाली-दिल चाहतावाली सोनाली अशी वेगवेगळी नावेदेखील त्यांना […]

अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले

स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात अशा भूमिका करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाकीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं […]

हिंदी,मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू

रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे.  त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना  रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होती. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून […]

1 313 314 315 316 317 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..