थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात ‘सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे […]
भारताचे सातवे पंतप्रधान सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून असली तरी त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती विश्वनाथ प्रताप सिंग होते. वयाच्यापाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी (ते सिंग यांचे चुलते होते) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तकपिता […]
सर्वपक्षीय राजकारण्यांपासून ते राजकारणात रस नसणाऱ्या सामान्य माणसापर्यंत भारतीय जनतेच्या हृदयात त्यांना आजही मोठ्या प्रेमाने दिलेले मानाचे आयर्न लेडीचे स्थान कायम आहे. पोलादी व्यक्तीमत्व भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! […]
डीडी हे त्यांचे टोपण नाव….. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्याा डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी पुण्याजवळ कोंडुर येथे झाला. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन […]
विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माता होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबई येथे झाला. विद्या सिन्हा यांना वयाच्या १८ व्या वर्षी मिस मुंबईचा किताब मिळाला होता. विद्यासिन्हा यांचे १९७४ साली आलेल्या रजनीगंधा व नंतर छोटीसी बात या दोन चित्रपट गाजले होते. विद्या सिन्हा २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले […]
पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट सांगताना केरसी लॉर्ड , दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत असत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले […]
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. […]
श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर असे होते. निर्देशक विजय भट्ट यांनी ते नाव बदलून श्यामा हे नाव ठवले. श्यामा यांनी सुमारे १७५ चित्रपटांमध्ये काम केले होते. श्यामा यांचा जन्म ७ जून १९३५ रोजी लाहोर येथे झाला होता. १९५३ साली त्यांनी दिग्दर्शक फली मिस्त्री यांच्याशी लग्न केले. १९५० आणि १९६० च्या दशकात श्यामा या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी […]
सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग […]