नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

नाट्य आणि संगीतातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व फय्याज शेख

सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ रोजी झाला. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या मा.फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पूर्ण नाव फय्याज इमाम शेख. फय्याज शेख या मूळच्या सोलापूरच्या. खरं तर कर्नाटकातल्या […]

विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला […]

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.त्यानंतर दीपिकाने बीए करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम […]

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. दीपिकाने बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’ सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा […]

सुप्रसिध्द संतूरवादक पं. उल्हास बापट

अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, […]

मराठी कवयित्री आणि कथालेखक इंदिरा संत

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या मा.इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले […]

गायिका बेला शेंडे

‘बेला शेंडे’ म्हटलं की आपल्याला कुठली गाणी आठवतात? ‘नटरंग’ ची ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली लावणीगीते आठवतात, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’ किंवा ‘ओल्या सांजवेळी’ सारखी हळुवार प्रेमगीते आठवतात. ‘जोधा अकबर’ मधलं ‘मन मोहना’ आठवतं.. पण तुम्ही बेलाचं कधी breathless गाणं ऐकलंय का? फार लोकांना माहिती नसलेलं हे […]

पंचम, उर्फ राहुल देव बर्मन अर्थातच आर. डी. बर्मन

राहुल देव बर्मन यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. त्यांचा जन्म २७ जून, १९३९ रोजी झाला. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. पंचम ऊर्फ आर. डी. बर्मन यांचे संगीत म्हणजे… एकीकडे तरल.. भावूक… संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू… […]

जेष्ठ अभीनेते प्रदीपकुमार बटव्याळ उर्फ प्रदीपकुमार

अभीनेते प्रदीपकुमार हे बंगाली नट. देवकी बोस यांच्या ‘अलकनंदा’ या बंगाली चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश फिल्मिस्तानच्या ‘आनंदमठ’ या चित्रपटाने झाला. या चित्रपट संस्थेचे त्याची भूमिका असलेले ‘अनारकली’ व ‘नागिन’ हे चित्रपट तुफान गाजले. या बाबतीत ते फिल्मीस्तानचे सर्वेसर्वा शेठ तोलाराम जालन यांचे ऋण मानीत असे. कारण चित्रपट […]

ज्येष्ठ सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान

भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ पार्श्वगायक व सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्य वादनाची […]

1 246 247 248 249 250 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..