नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

माझी माणसं – अब्दुल

आजपर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो’चटका’दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे . […]

माझी माणसं – दत्ता काका

दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ‘ रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ‘ असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला ! […]

माझी माणसं – बंडू दादा

तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही . […]

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर

मराठी सिनेसृष्टीतील अॅक्शन आणि रोमॅण्टिक हिरो म्हणून अभिनेता संतोष जुवेकरची ओळख आहे. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९८४ रोजी झाला. विविध सिनेमे आणि मालिकांमधून तो आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतो. ‘बेधूंद मनाची लहर’, ह्या ‘गोजिरवाण्या घरात’, ‘किमयागार’ या मालिकांमधून त्याने आपली विशेष छाप पाडली आणि आता ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संतोष जुवेकरने त्यानंतर काही […]

सागर आर्टसचे संस्थापक डॉ. रामानंद सागर

रामानंद सागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद […]

दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता

बाबूराव नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. […]

सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर

रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. […]

बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका […]

मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए.

जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. त्यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात. निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व […]

कवी प्रदीप

कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ […]

1 243 244 245 246 247 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..