नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

कवयित्री संजीवनी मराठे

कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणार्‍या संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत. […]

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओम प्रकाश सैनी

राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी! […]

जेष्ठ हिंदी कवी, लेखक पं. नरेंद्र शर्मा

विविध भारतीवर पहील्या गाण्याची सुरवात संगीतकार अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत पं. रविशंकर यांनी दिले होते. […]

भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नानासाहेब सरपोतदार

भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, […]

ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका वंदना मिश्र (पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर)

ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी…मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर. मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व. […]

पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती

पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८ रोजी झाला. कविता कृष्णमूर्ती या मूळच्या दिल्लीच्या. वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, […]

मराठी नट, लेखक, दिग्दर्शक सुरेश विनायक खरे

१९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. “जानकी” या चित्रपटाचं ‘चित्रावलोकन’ हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. ‘गजरा’ आणि ‘नाट्यावलोकन’ हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या कार्यक्रमांवर उमटवला. […]

माजगांवची म्हातारपाखाडी; मुंबईचा एक ऐतिहासिक ठेवा..

आपल्या ऐतिहासिक वारशाचं परदेशींना कौतुक, अप्रूप आहे, पण आपल्या देशी राज्यकर्त्याना आणि नागरीकांनाही नाही, याचं दु:ख बाप्टीस्टांप्रमाणे मलाही आहे.. खरंतर मुंबईतली ही अशाप्रकारची एकमेंव वस्ती नाही. उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरीतल्या आंबोली परिसरात अशाच प्रकारच्या वस्ती आहेत, पण पुनर्विकासाच्या नांवाखाली त्याही उध्वस्त होत चालल्या आहे. म्हातारपाखाडी अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. […]

रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला.  सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात […]

पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मे पुं रेगे

मे.पुं रेगे हे व्यवसायाने ‘तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. भारतीय आणि पाश्चात्त्य या […]

1 225 226 227 228 229 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..