पत्रकार, विचारवंत आणि लेखक कुमार केतकर
ज्यैष्ठ पत्रकार आणि विचारवंत, कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार श्री कुमार केतकर यांनी गेली अनेक वर्षे इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेत भरीव योगदान दिले आहे. […]
या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..
ज्यैष्ठ पत्रकार आणि विचारवंत, कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार श्री कुमार केतकर यांनी गेली अनेक वर्षे इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेत भरीव योगदान दिले आहे. […]
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. “Contribuiton of Women writers in Marathi Literature” या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र […]
प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर यांचा जन्म ३ जानेवारी १९६१ रोजी झाला. राजेंद्र खेर हे, आपले आजोबा द. म. खेर आणि वडील भा. द. खेर यांच्या लेखनाचा वारसा पुढे चालवणारे लेखक म्हणून ओळखले जातात. एक विशेष योगायोग म्हणजे ‘हॉलिवूडचे विनोदवीर’ हे त्यांचं पहिलं पुस्तक त्यांच्या वडिलांच्या, भा. द. खेरांच्या ‘पूर्णाहुती’ या १०० व्या पुस्तकाच्या प्रकाशानाच्या सुमारासच प्रसिद्ध झालं होतं! […]
भाजपचे जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचा जन्म ३ जानेवारी १९३८ रोजी झाला. राजस्थानच्या राजघराण्यात जन्मलेल्या जसवंतसिंह, उच्च शिक्षणानंतर तेव्हाच्या दरबारी अलिखित प्रथेप्रमाणे सैन्यात अल्पकाल सेवा बजावून परत आले. राजकारणातला त्यांचा ओढा लक्षात घेऊन आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधले धुरंधर नेते भैरोसिंह शेखावत यांना जसवंतसिंह राजकारणात आणले. मुळात राजघराण्यातील असल्याने जसवंतसिंह यांचे वागणे आणि शालीन तसेच सुखासीनही […]
अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी झाला. नवनीत कौर या मूळच्या पंजाबी. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत राणा यांचे शिक्षण मुंबईत झालेले आहे. आधी मॉडेलिंग नंतर म्युझिक अल्बम आणि नंतर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नवनीत कौर राणा यांनी तेलगू , कन्नड आणि पंजाबी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला […]
दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ लाहोर येथे झाला. चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेल्या चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट […]
संजय खान यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.’दस लाख’,’एक फूल दो माली’,’इंतकाम’,’उपासना’,’मेला’,’नागिन” सोना चांदी’,’काला धंधा गोरे लोग’हे […]
मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. फुले परिवार हा मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस […]
‘फॉर्मूला वन’चा माजी विश्वविजेता मायकेल शुमाकरचा जन्म ३ जानेवारी १९६९ रोजी हुर्थ, पश्चिम जर्मनीत झाला. मायकेल शुमाकरने १९९१ साली बेल्जियम ग्रँड प्रिक्सजमध्येद पर्दापण केले होते. त्या ने २००० ते २००४ असे सलग पाच वर्षे एफ वनचे विजेतेपद पटकावले होते. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरीक होता त्याच्या यशामुळे फॉर्म्युला वन स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय […]
चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. कै यशवंत दिनकर फडके यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडके यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions