नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

ज्येष्ठांच्या निर्वाहासाठी नियम २०१०

भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्थेस महत्त्वपूर्ण स्थान आहे. परंतु या सध्याच्या परिस्थितीत विभक्त कुटुंब पध्दत उदयाला येताना दिसते. सर्वात मोठा प्रश्न आहे तो वृध्दांचा (ज्येष्ठ नागरिकांचा). मुलांचा सांभाळ करुन त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यानंतर करिअरच्या मागे धावणार्‍या मुलांनी पालकांकडे पाठ फिरविली. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर प्रश्न आहे तो आधाराचा. मुलं वृध्दापकाळातील आधाराची काठी असतात, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, परंतु याचा विसर पडू लागला आहे. आता यावर उपाय म्हणून शासनानेच लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी व कल्याणासाठी नियम २०१० तयार केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात अडचणी येणार नाहीत, त्यांना जगण्यासाठी त्रास होणार नाही यांची काळजी घेतली आहे.
[…]

सुट्टय़ांच्या काळात अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी मोहिमेची गरज – गृहमंत्री आर आर पाटील

दिवाळी आणि एप्रिल-मे महिन्यांच्या सुट्टय़ांच्या काळात राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढलेले असते. दरवर्षी सुमारे १२ हजार इतक्या लोकांचे मृत्यू रस्त्यावरील अपघाताने होतात तर सर्वसाधारण ५० हजार लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या सुट्टय़ांच्या काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी मोहीम हाती घेण्याची गरज गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली.
[…]

रेखाटलेला महाराष्ट्र…

वैभवशाली इतिहासाचा गौरवशाली कर्तृत्वाचा महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात, दिमाखात वर्षभर साजरा करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखिल राज्याची प्रगती विविध प्रकाशनांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली आहेत.
[…]

गुंतवणूक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर

दिवाळीच्या निमित्ताने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची प्रथा श्रद्धेने पाळली जाते. सोने, शेअर्स, मालमत्ता यातील गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देतेच, पण सोन्यातील गुंतवणुकीकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहणे बंद करायला हवे. या बरोबरच अलिकडे चांगल्या कलाकृतींमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड येऊ घातला आहे. या ट्रेंडचाही विचार करायला हरकत नाही.
[…]

भाऊबंदकीत हरवताहेत जनतेचे प्रश्न

ताज्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या वादविषयाला तोंड फोडले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आजवर बाळासाहेबांवर कधीही टीका न करणार्‍या राज ठाकरे यांनी या सभेत शरसंधान केले. त्याला बाळासाहेबांकडून लगेचच प्रत्युत्तर दिले गेले. पण भाऊबंदकी बाजूला ठेवून जनतेच्या समस्यांबद्दलच बोलायचे का ठरवले जात नाही ? मनोरंजनापेक्षा जनतेला रोजच्या प्रश्नांचा उलगडा हवा आहे.
[…]

मिल्क एटीएमचे वेधक तंत्र

एटीएम मशीनमधून हवी तेव्हा आणि हवी तिथे रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली. याच धर्तीवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची व्हेंडिग मशीन्सही आढळून येतात. अशा परिस्थितीत प्रत्येक घराची मुलभूत गरज असलेले दूध हवे तेव्हा का मिळू नये असा प्रश्न समोर येतो. कॉर्पोरेटजगतातील नवतेचे अनुकरण करत दुग्ध व्यवसायानेही अलीकडेच कूस पालटत एटीएम तंत्राचा अंगीकार केला आहे. या तंत्राचा खास वेध.
[…]

बाल निरीक्षणगृहास (रिमांड होम) आयएसओ

सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणार्‍या उद्योगांनी गुणवत्तेचे निकष पूर्ण केल्यास संबंधित संस्थेला आयएसओ ९००१/२००० मानांकन मिळत असते. खाजगी संस्थेबरोबर शासकीय संस्थाही आता आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना मिळणारे आयएसओ मानांकन म्हणजे खाजगी सेवा क्षेत्रा इतकेच तोडीस तोड सेवा देऊन नागरिकांच्या सेवेला सदैव हजर असल्याची ती एक पोचपावतीच होय.
[…]

1 107 108 109 110 111 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..