आजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील. […]
झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही. […]
जीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो. […]
पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली […]
१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला. […]