नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

मंगळावरचे आवाज

बॅप्टिस्ट चाइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून मंगळावर आवाजाला ‘दुहेरी’ वेग असल्याचं तर दिसून आलं आहेच; परंतु त्याचबरोबर आणखी एक गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, सर्वच प्रकारच्या आवाजाच्या वेगात दिवसातील वेळेनुसार होणारा लक्षणीय बदल. मंगळावरच्या सकाळनंतर सर्वच ध्वनिलहरींचा वेग हळूहळू वाढत जाऊन मध्यान्हीच्या सुमारास तो कमाल पातळी गाठतो. त्यानंतर कमी होत-होत संध्याकाळपर्यंत तो बराच कमी झालेला असतो. […]

दिशादर्शकं

सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे. […]

पहिला भक्षक?

सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अ‍ॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अ‍ॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे. […]

मानवपूर्व अग्नी

सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती. […]

भाषांचं आकलन

सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. भाषा कोणतीही असो. तिचं आकलन होण्यासाठी मेंदूतले काही ठरावीक भागच सक्रिय होत असतात. हे सक्रिय भाग मेंदूतील पुढच्या, वरच्या तसंच खालच्या भागात वसले आहेत. किंबहुना सक्रिय होणाऱ्या भागांबद्दलचे हे निष्कर्ष अपेक्षितच होते. […]

चंद्राची निर्मिती

चंद्राची निर्मिती कशी झाली याबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती कशी झाली यावर अनेक शास्त्रज्ञांनी तर्क लावले. चंद्राची निर्मिती ही सूर्यमायेच्या उत्पत्ती नंतर सुमारे ५ कोटी वर्षानंतर म्हणजेच जवळपास ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असा शास्त्रज्ञांचा दावा आहे . चंद्राच्या उत्पत्ती बद्दल मुख्य चार मतभेद आहेत. […]

नार्को ॲ‍नालिसिस

या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते. […]

सर्वात मोठ कृष्णविवर !

S5 0014+81 हे मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर आहे. हे मानवाला २०२१ ला सापडले . याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ४० अब्जपट असून (वर्षाला ४००० सूर्यांच्या वस्तुमानाइतका पदार्थ गिळतं हे कृष्ण विवर) हे कृष्णविवर सातत्याने पदार्थ गिळंकृत करत असल्याने या कृष्णविवराभोवती अत्यंत तेजःपुंज अशी तबकडी तयार झाली आहे ,असे संशोधनाद्वारे दिसून येते . हे तेज आपल्या सूर्याच्या तेजाच्या ३०० पद्मपट (१ पद्म = १००० अब्ज) अधिक आहे किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांचं तेज एकत्रित पकडलं, तर त्या तेजाच्या २५००० पट अधिक तेजःपुंज आहे या कृष्णविवराची तबकडी. […]

ब्लॅक होल

वैज्ञानिकदृष्ट्या, ब्लॅक होल हा अंतराळातील एक अत्यंत मजबूत गुरुत्वाकर्षणाचा भाग आहे की प्रकाश देखील त्यातून बाहेर पडू शकत नाही. सर्वसाधारणपणे कृष्णविवर म्हणजे अगदी लहान बिंदूमध्ये मोठ्या वस्तुमानाचे संकलन होय. ब्लॅक होलच्या प्रदेशाची सीमा ज्यातून सुटणे शक्य नाही त्याला इव्हेंट होरायझन असे म्हणतात. प्रकाश परावर्तित होत नसल्याने ब्लॅक होलचे निरीक्षण करणे कठीण आहे. गुरुत्वाकर्षण ही सर्वात कमकुवत शक्ती मानली जात असली तरी कृष्णविवरांच्या बाबतीत ती खूप मजबूत असते. जेव्हा खूप मोठे तारे त्यांच्या चक्राच्या शेवटी कोसळतात तेव्हा तारकीय वस्तुमानाचे ब्लॅक होल तयार होणे अपेक्षित असते. बहुसंख्य आकाशगंगांच्या केंद्रांमधून सुपर मॅसिव्ह कृष्णविवर बाहेर पडतात असाही अंदाज आहे. […]

बायोकेमिस्ट्रीची सुरुवात

आपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे ! […]

1 42 43 44 45 46 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..