नवीन लेखन...

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती । परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।। लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा । जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।। झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा । तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।। प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही […]

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले,स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ,वनी धाडूनी राम प्रभूला  । पालन केले तेच […]

पूजाविधी गाभा

सोडूनी दिली मी पूजाअर्चा,समाधान मज ज्यात न लाभले दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,एक भाग तो सदैव वाटले बालपणी मज कुणी शिकविले,पूजाअर्चा आन्हकी सारे ठसले नाही मनात कधीही,भक्तीला हे पोषक ठरे पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,लक्ष आमचे केंद्रीत होते हळदी कुंकू गंध फूले आणि,दीपधूप हे मधूर जळते सुबकतेच्या पाठी लागूनी,यांत्रिकतेसम आम्ही झालो अर्थ ज्याचा कधी न कळला,मंत्र मुखोदगत वदू लागलो वास्तव्य ज्याचे […]

चाळीशी

आयुष्य पुढे धावत असते, वय सारखे वाढत असते, पण…… खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते ,,,,, उच्छृंखल आणि समंजसपणा, यामधली मर्यादा कळते, अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,, जगण्याची परिभाषा, थोडी थोडी बदलू लागते, काय हवे अन् काय नको, हे नेमकेपणे कळू लागते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,,, मन जोडीदाराचं, […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहाते फुलवित सारी जीवने पडेल प्रवाहीं कुणी लागते त्याला वाहणे ।।१।। काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो प्रवाही वेगाचे हे काम  ।।२।। बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती ।।३।। देह क्षणाचा जरी, कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या कल्पतरूची, आठवण काढती इतर ।।४।। […]

स्त्री शक्ती

कधी क्वचित मी खचून जाता उंच भरारी घेते मी टपकलेच जर अवचित अश्रू नकळत त्यांना पुसते मी थोपटते मी माझे मजला गोंजारते मलाच मी ऊर्मी माझ्या अंतरातल्या नजाकतीने जपते मी दुखता खुपता होता अगतिक दु:ख झुगारुन देते मी नव्या दमाने श्वास घेउनी पुढे पुढे हो जाते मी मीच असते तेव्हा माझी भक्ति मी शक्तिही मी माझ्या […]

माणसं अन माणुसकी नसलेली घरे

कुणीच कुणाच्या जवळ नाही, हीच खरी समस्या आहे, म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी, आणि अमावस्या जास्त आहे . हल्ली माणसं पहिल्या सारखं, दुःख कुणाला सांगत नाहीत, मनाचा कोंडमारा होतोय, म्हणून आनंदी दिसत नाहीत . एवढंच काय,एका छता खाली राहणारी तरी , माणसं जवळ राहिलीत का ?, हसत खेळत गप्पा मारणारी , कुटुंब तुम्ही पाहिलीत का ? अपवाद […]

दयेची बरसात

समर्थ नाहीं कुणी,जाणून घेण्या प्रभूला थोटके पडतो सारे,घेण्यास त्याच्या दयेला बरसत असे दया,प्रचंड त्या वेगाने दुर्दैवी असूनी आम्हीं,झेलतो फाटक्या झोळीने असीम होते कृपा,पात्र नसूनी कुणी तो बरसत राही सतत,परि आहे सारे अज्ञानी दयेच्या तो प्रवाह,वाहात राही नदीसारखा डूबती कांहीं त्यांत,परि न दिसे अनेकां नशीब लागते थोर,पेलण्यास दया ती जलांत असूनी कांहीं,तहानलेली राहून जाती शिवून तुमची झोळी,प्रथम पात्र […]

चहास्तोत्र

शीणसुस्ती महानिद्रा क्षणात पळवी चहा, प्रभाते तोंडधुवोनी, घेता वाटे प्रसन्नता !!१!! अर्धांगीनीहस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे, पुन्हा स्नानांतरे घेता अंगी चैतन्य सळसळे !!२!! लिंबुयुक्ता विना दुग्धा अरूची पित्त घालवी, शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी !!३!! शितज्वर शिर:शुळा , खोकला नाक फुरफुरा, गवतीपत्र अद्रकायुक्ता, प्राशिता जाई सत्वरा !!४!! भोजनपुर्व प्राशिता, मंदाग्नी पित्तकारका, घोटता घोटता वाढे, टँनीन जहरकारका […]

1 300 301 302 303 304 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..