नवीन लेखन...

मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे

मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’  ।। ‘मद्य मद्य’ करुं या  हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे ।। जरि असलो आम्ही […]

ऑफिसातले माणिकमोती -२

तमाम पब्लिक धावतं उगवत्या सूर्याला नमन करायला. शेठच्या मुलानं बोलावतांच, सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला.                                                                – तोंड घट्ट मिटून किती गूढ गुपितं आंत दडवून ठेवतं ऑफिसचं भलंमोठं सेफ.                                                                – प्रवास बोरीवली ते फोर्ट डोंबिवली ते कोर्ट. लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं. – सुभाष स. नाईक

हलकेंफुलकें काव्य

  कंबरेस दाबसी कां ? निश्चल उभा, ना हलतां कुठे तुझा कंबरपट्टा ? Belt  कुठे विठ्ठला तुझा ? सर्व जगीं, सार्‍या जागीं चालत आहे घुसखोरी नुरे अन्य स्थानचि तुजसी एक फक्त वीटच उरली . जगीं फार पाप वाढे तें तुला खपावें कैसें ? म्हणुन कटीवर कर ठेवुन तूं उभा , जाब पुसण्यांस , विठू  ? विठू, […]

या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं

या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं मंजूरच सार्‍या शर्ती, चला रे पीत बसूं श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं  ।। ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं ती नित्य देतसे स्फूर्ती , चला रे पीत […]

आमची माती

आमचं अन्न, आमची माती आमचं धान्य, आमची शेती कळेनाच कोणालासुद्धा कुठून कोठे जाती ! – आमच्या विहिरी, आमच्या सरिता, आमचे निर्झर अन् सरोवरें पडतिल कधि कोरडेठाक हे, कोणां ना ठाऊकच रे ! – वितळतील कां नद्या हिमाच्या चढेल वरवर सागर-पाणी ? बुडतिल कां काठाची शहरें ? विचार हृदयीं कंपन आणी ! – ‘घडलें नाहीं असें आजवर […]

नमन

नमन माझे श्री गणेशाला वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला परमात्म्याची विविध रुपें   ।।१।। परमेश्वराची लीला महान घ्यावी सर्वानी जाणून टाकून सारे ब्रह्मांड व्यापून चालवितसे खेळ जीवनाचा   ।।२।। विश्वाचा तो अधिनायक जीवन धर्माचा तो पालक जीवन गाड्याचा तो चालक परब्रह्म परमात्मा   ।।३।। नसे त्यासी मृत्यु- जन्म कार्य करी तो अवतार घेऊन कुणामध्यें अंशरुपे […]

तल्लीनतेत आहे ईश्वर

श्रीकृष्णाचे जीवन   बनली एक गाथा यशस्वी होई तुमचे जीवन   चिंतन त्याचे करिता    ||१|| तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर तल्लीनतेचा आनंद लुटा    शिकवी तुम्हा मुरलीधर    ||२|| बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी    ||३|| मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी    ||४|| टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

चांदण्यातील आठवणी

हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।। आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।। कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।। जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  ।। परिस्थितीच्या […]

1 279 280 281 282 283 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..