संक्रांत

तीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत। संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।। — द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

पिंडीतील ब्रह्मांड

विज्ञानाने शोधली, अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली, अणूंतील उर्जा शक्ती सुक्ष्म असूनी अणु आकार, सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार, फोडतां अणु मध्यभागीं विचार मनीं येई , कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला, कशी उर्जा लाभली समजोनी घ्या एक, निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील, प्रचंड त्याची योग्यता जीव देहाचे पिंड, जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते […]

भावनांची घरें

घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।। वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी ।।१।। ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो निरखूनी ।।२।। राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी ।।३।। दया क्षमा शांति […]

सती सावित्री अर्थात वटपौर्णिमा व्रत

स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री ।।१।। ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले ।।२।। जरी येतां काळ चुकवावी वेळ बदलेल फळ हेच दाखविले तीने ।।३।। समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं ।।४।। मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे […]

1 228 229 230 231 232 256