नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मातृभक्त सैनिक

एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे. एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. […]

संतुलनाची गरज

निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे ‘नको तो उन्हाळा’असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते. निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी […]

मन चंगा तो…

‘मन चंगा तो बगल मे गंगा’ असे म्हणतात. तुमचे मन जर शुद्ध, पवित्र असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी शुद्ध व चांगल्याच वाटतील. एखादा चांगला पदार्थ जर स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या भांड्यात ठेवला तर कोणाला देताना निश्चितच आनंद होईल. एका मनुष्याने सत्संगतीसाठी एक चांगले गुरू केले होते. दररोज तो त्यांच्याकडे जायचा व म्हणायचा, मला चांगला उपदेश […]

स्वरभास्कर भीमसेन जोशी आणि मी

पांढरा शुभ्र सदरा ..लेंगा ..खांद्यावर शाल असा साधासा पोशाख असलेले भीमसेन जोशी सवाईच्या मंडपात जेव्हा सगळीकडे नजर ठेवून असत तेव्हा दरारा वाटे. […]

वाचनवेडे अरविंद घोष

प्रारंभी जहाल क्रांतिकारक बनलेले परंतु नंतर अनेकांचे आध्यात्मिक गुरु झालेले अरविंद घोष यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. डॉक्टर असलेले त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष हे इंग्लंडला जाऊन शिकून आले होते. त्यामुळे त्यांच्या राहणीवर तसेच विचारसरणीवर पाश्चात्यांचा फार प्रभाव होता. आपल्याही मुलांनी संपूर्णपणे इंग्लिश लोकांसारखे राहिले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. इंग्रजी आमदानीत वाढलेले डॉ. कृष्णधन घोष नास्तिक […]

व्यक्ती आणि समाज

व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा […]

वेळेचे महत्त्व

कोणतेही काम वेळच्या वेळी केले तरच त्याचे फळ चांगले मिळते. संत कबीरांनी म्हटले आहे, ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब! पल मे परलय होगी बहुरि करेगा कब ?’ ‘ चांगल्या कामाच्या बाबतीत तर मुळीच चालढकल करून चालणार नाही, कारण ‘ उद्याच्या भविष्यात काय दडले आहे हे कोणीच सांगू शकत नाही. एक शेतकरी होता. […]

नाव असे अजरामर होते

गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर असंख्य लोक या नव्या धर्माकडे आकर्षित झाले. हळूहळू गौतम बुद्धाचा शिष्यपरिवार वाढत गेला. प्रत्येक शिष्याला वाटे स्वतः गौतम बुद्धांनी आपल्याला काही तरी काम सांगावे. एका शिष्याला स्वतःच्या नावाचा फार अभिमान होता. ते लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी एकदा त्याला ‘तू तुझे नाव अजरामर कर’ अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे तो शिष्य स्वतःचे […]

सहृदयता हवी

थोर तत्त्वज्ञ कन्फ्युनिअस याची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे खास वैशिष्ट्य होते. त्याला बासरी वाजवायचा फार नाद होता. अनेकदा तो बासरी वाजवत एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असे. पैसा आणि संपत्तीपेक्षा त्याला मानवता जास्त प्रिय होती. त्यामुळे साहजिकच त्याच्याजवळ फारसा पैसा नव्हता. त्याची त्यालाही कधी खंत वाटली नाही. एकदा कन्फ्युनिअस असाच एके ठिकाणी बासरी वाजवत […]

नम्रतेची किंमत

अंगात नम्रता, विनयशीलता असली, की आपले कोणतेही काम सुकर होतेच. शिवाय आपलेही महत्त्व वाढते. नम्रतेची किंमत किती आणि कशी असते या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते… एक राजा एकदा त्याच्या प्रधानासह राजधानीचा फेरफटका मारायला निघाला. हा राजा खरोखरच अतिशय नम्र व प्रजाहितदक्ष होता. प्रजेची काळजी घेण्यात तो कोठेही स्वतःला कमीपणा मानत नसे. प्रधान आणि इतर मंत्रिजनांबरोबर […]

1 450 451 452 453 454 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..