नवीन लेखन...

औदुंबर/उदुंबर/उंबर

श्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ गोल असून २.५-५ सेंमी व्यास असलेले असते.फळे गुच्छात उगवतात.फळात लहान किडे असतात.खोडाचा छेद […]

वासा/अडुळसा

१-३ मीटर उंचीचे अडुळशाचे झुपकेदार क्षुप असते.ह्याची पाने ८-१० सेंमी लांब व काळपट हिरवी,गुळगुळीत व भालाकार असतात.फुले २-५-८ सेंमी लांब मंजिरी स्वरूपात असतात.पाकळ्यांची रचना हि सिंहाच्या जबड्या प्रमाणे असते.फळ २ सेंमी लांब लवयुक्त व शेंगेच्या स्वरूपात असते. अडुळशाचे उपयुक्तांग आहे मुळ,पाने,फुले.अडुळसा चवीला कडू,तुरट असून थंड गुंणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर आहे. चला […]

सप्तपर्ण/सातविण

हा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते […]

जांभूळ/जम्बू

सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे फळ,त्वचा,पाने व बी.जांभुळ चवीला तुरट,गोड,आंबट असते.गुणाने थंड व जड व रूक्ष असते.जांभुळ कफ पित्तनाशक व […]

अशोक

हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात. अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व […]

शिरीष

ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात. ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न […]

करंज

ह्याचा मध्यम आकाराचा ८-१६ मी उंचीचा वृक्ष आहे.ह्याची पाने २०-४२ सेंमी लांब असतात तर पत्रके ५-१० सेंमी लांब असून हि ५-७ पत्रके असतात.फुले निळसर पांढरी असून प्रत्येक फळात अंडाकार किंवा वृक्काकार बी असते.हि बी १.७-२ सेंमी लांब व १.२-१.८ सेंमी रूंद असते.ह्यात तांबुस रंगाची तैलयुक्त बीज असते. करंजाचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने,बीज.करंज चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचा […]

कांचनार

हा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी रूंद असते.ह्या चपट्या व कडा मुडपलेल्या शेंगा असतात.शेंगेत १०-१५ बिया असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फुले.ह्याची […]

पळस/पलाश

पळसाला पाने तीन हि म्हण मराठी मध्ये फारच प्रचलित आहे.म्हणी मध्ये जसा हा पळस वापरला जातो तसाच ह्याचा उपयोग आयुर्वेदीय उपचारात देखील केला जातो. ह्याचे १३-१५ मीटर उंचीचे व १.५-२ मीटर रूंद बुंधा असलेला वृक्ष आहे.ह्याचे काण्ड खडबडीत,साल फाटलेली व भुरकट रंगाची असते.पाने संयुक्त,गोलाकार,तीन दिले असलेले १०-२० सेंमी लांब असते.फळ १५-२० सेंमी लांब व ४ सेंमी […]

भल्लातक/बिब्बा

माझ्या माहिती प्रमाणे बिब्याचा वापर पूर्वी परिट कपड्यांवर खुणा करून ठेवायला करत असत.तर असा हा बिब्बा औषधांमध्ये काळजीपूर्वक वापरल्यास अमृता समान काम करतो. ह्याचा ७-१२ मीटर उंच वृक्ष असतो.काण्डत्वचा काळपट राखाडी असते व तोंडल्यावर त्यातून दाह जनक रस निघतो.पाने ३०-७५ सेंमी लांब असून १२-३० सेंटीमीटर रूंद असतात.हि अभिलट्वाकार असून शाखेच्या अग्रभागी उगवते.फुल एकलिंगी असून हिरवट पिवळे […]

1 2 3 4 5 6 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..