डोक्याला ताप देणार्या उवा
उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस, जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात. त्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात. उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात. त्यामुळे खूप खाज सुटते. डोक्यात एखादीही ऊ असली तरी खूप खाज सुटते. उवांची अंडी केसांच्या मुळांना चिकटून राहतात. उवा अस्वच्छतेमुळे व निकृष्ट राहणीमानामुळे एकमेकांत पसरतात. एकमेकांचे कपडे, पांघरूण, इत्यादी वस्तूंमार्फत, तसेच प्रवासात – शाळेत जवळ बसल्याने […]
