नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

नैवेद्य भाग १

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय ? नीट बघा. कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा. नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात तूप असतेच. नैवेद्य दाखवताना मंत्र आहेत. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा सहा वेळा हे मंत्र म्हणत ताटाभोवती पाणी फिरवायचे असते. हे घास आपण देवाला […]

वदनी कवल भाग ३

तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे. या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात) वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे l सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे l कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात l श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात l करुनी स्मरण तयांचे अन्न […]

वदनी कवल भाग २

नाम घ्या श्री हरीचे…… गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे. या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी सहजपणे मी घेतोय, त्यासाठी कोणतेही मोल मला द्यावे लागत नाही. तुच दिलेले अन्न सेवन करतोय, पोटात ढकलतोय, आता पुढची जबाबदारी हे […]

वदनी कवल भाग १

वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण होणे जाणिजे यज्ञकर्म हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया. मुखी घास घेता करावा विचार. कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझे हाती नित्य देशसेवा म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा असा परिवर्तित […]

आहाररहस्य १३

मना सत्य संकल्प….स्वास्थ्य संकल्प जीवी धरावा…. आधी एक ठरवूया, किती वर्ष जगायचंय ? आपली मानसिकताच इतकी बदलून गेली आहे, की कोणी शंभर वर्षासाठी जगायच्या शुभेच्छा दिल्या तर त्याही नको वाटतात. “पुरे झाले मिळाले तेवढे आयुष्य.” “कंटाळा आला.” “काय करायचे आहे जगून.” “नको रे बाबा, हे असलं जगणं.” “आता काऽही शिल्लक राहिले नाही” नकोत ती औषधे, नकोच […]

आहाररहस्य १२

आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले. म्हणजे, मी जे तेल लहानपणापासून खात आलोय ते मला कसे पचवायचे, ते माझ्या शरीराला माहीत असते. त्यासाठी विशिष्ट कष्ट घेण्याची शरीराला गरज […]

पिताम / दादड येणे

अंगावर गांधी (दादड) उठून, अत्यंत त्रास देणाऱ्या अश्या “पिताम” बद्दल आज पाहुया. ह्या पिताम/दादड सोबत खाज येत असेल तर त्याला उदर्द, कोठ असे म्हणतात तर वेदना जास्त असल्यास आयुर्वेदात शीतपित्त असे नाव आहे. आधुनिक शास्त्रानुसार त्यास Urticaria म्हणतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वास हा रोग जडू शकतो, ह्या रोगात अंगावर अचानक गांधी (दादड) उठतात व अंगास खाज सुटते. […]

आहाररहस्य ११

आहाराचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम गीतेमध्ये अतिशय सुंदर शब्दात वर्णन केला आहे. दीपो भक्षयन्ते ध्वान्तं कज्जलंच प्रसूयते । यद् अन्नं भक्षयेत् नित्यं जायेते तादृशी प्रजा ।। ज्या प्रमाणे दिवा जळतो आणि काजळी तयार होते, तसा जसा आहार तशी परिणति होते. जसा दिवा तशी काजळी. म्हणजे जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. जर दिवा […]

अल्सर म्हणजे काय ?

अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतडय़ालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. पण हे नेहमी बघायला मिळणारा अल्सर हा जठर किंवा डय़ुओडेनमला होणारा. लक्षणे कोणती? अल्सरच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू […]

आहाररहस्य १०

आहाराचा किती सूक्ष्म विचार उपनिषदांमधे केलाय. उपनिषदकार म्हणतात, जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी, प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण, आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन. याला पुरावा काय ? असा तिरकस प्रश्न विचारू नये. भारतीय दर्शन शास्त्रे, हीच पुरावा आहेत. हेच आप्तवचन आहे. आप्त […]

1 136 137 138 139 140 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..