नवीन लेखन...

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप चर्चा झाली होती. चर्चेत डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. […]

बालाकोट सर्जिकल स्ट्राईक

१९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्यांनी पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यही बिथरलं. त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही भारताने दिली नाही. ग्वालियरपासून उड्डाण घेतलेले भारतीय वायूसेनेचे १६ मिराज २००० ही लढाऊ विमाने मध्यरात्री साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत घुसली. या विमानाने बालाकोट भागात बॉम्ब हल्ले चढवले. जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले. यात अनेक दहशतवादी ठार झाले. […]

व्हॉट्सअपचा वाढदिवस

सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअप चा इन्कम महिन्याला फक्त ५००० डॉलर्स इतकाच होता. परंतु २०११ जेव्हा त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी आपले व्हॉट्सअप लाँच केले तेव्हा त्यांचा इन्कम २ वर्षात २० पटीने वाढला आणि त्यांचे अँप Play Store मध्ये २० व्या क्रमांकाचे अँप बनले. २०१४ मध्ये व्हॉट्सअप चा प्रभाव एवढा वाढला कि फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजर ची लोकप्रियता कमी होते की काय याची भीती वाटू लागली. […]

जागतिक मुद्रणदिन

इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात चीनी लोकांनी मुद्रणाची पद्धत शोधली. त्या पद्धतीत लागणारी उपकरणे म्हणजे कागद, शाई आणि मुद्रणप्रति मुद्रण प्रतिमा ही कोरून तयार केलेल्या पृष्ठाची असे. त्या काळात काही मजकूर (बौद्ध धर्मातील काही विचार) संगमरवरी (दगडी) खांबावर कोरून ठेवलेले असत. […]

रिअल ब्रेड वीक

ब्रेड हा आज अनेकांच्या रोजच्या आहारातील पदार्थ झाला आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘रिअल ब्रेड वीक’ म्हणजेच भेसळमुक्त पाव आठवडा म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ रिअल ब्रेड वीक साजरा केला जात आहे. जे नैसर्गिक पद्धतीने ब्रेड बनवतात, अशांसाठी हा आठवडा खास साजरा केला जातो. […]

केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क (सेंट्रल एक्साइज दिवस)

केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क बोर्ड केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. यांच्या खाली केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क, देशातील सीमाशुल्क, जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर आणि नारकोटिक्सची जबाबदारी आहे. […]

श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन

शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरु आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे अवतारही मानले जातात. गजाजन महाराजांच्या जन्माविषयी तशी कोणालाच खरी माहिती नाही. त्यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळणार आहे. कारण त्यांचा जन्म हा न उलगडलेलं कोडं आहे. पण असं म्हणतात […]

अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस

हिमालयाची डोंगररांग, हिमशिखरांतून वाहत येणाऱ्या नद्या व त्यांची खोरी, अप्रतिम जंगल अशा अनेक नैसर्गिक ठेव्यांचे वरदान लाभलेला असा हा अरुणाचल. एका चौरस किलोमीटरला १७ माणसे अशी भूभागाची वाटणी असलेला प्रदेश. स्थल पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, राफ्टिंग अशा अनेक उपक्रमांसाठी पूरक अशी ही भूमी. भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. […]

जागतिक खवलेमांजर दिवस

भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. […]

बटाट्याच्या चाळीची साठी

या आत्मचरित्रात एकामागून एक प्रसंगांच्या लडी उलगडत जातात. कौटुंबिक कापडखरेदी, सूट शिवणं, मुलांची शालेय प्रगती, सहकुटुंब नाटकाला जाणं, मावशीच्या पार्ल्यातल्या बिऱ्हाडाचा शोध, विडीचा ज्वलंत प्रश्न, खिसा कापला जाणं, ज्योतिष आणि अध्यात्मिक अनुभव, सारं कांही मध्यमवर्गी कारकुनी जीवनाचं सार! […]

1 24 25 26 27 28 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..