सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव लहान देश भारताकरता महत्त्वपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११-१४ मार्चचा सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा दौरा, प्रदीर्घ काळापासून उपेक्षित हिंदी महासागरातील देशांशी संबंध वाढविण्याचे पाऊल आहे. सेशेल्सची एकूण लोकसंख्या ८७ हजार आहे.११५ लहान-लहान बेटांनी बनलेल्या सेशेल्सचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५५ वर्ग किलोमीटर आहे. सेशेल्स हिंद महासागरातील एक लहानसे मात्र सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे द्विप […]
मुख्यमंत्री सईदवर लगाम घाला नाही तर सरकार बरखास्त करा पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती […]
दहशतवादाचे स्वरुप अतिवेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेत दहशतवादाचे जाळे फ़ार वेगाने विस्तारत आहे. तसेच एकट्याने दहशतवादी कृत्ये करण्याचा नवा प्रकार उदयास येत आहे. या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करणे कठीण असते. त्यामुळे अशा दहशतवाद्यांच्या कारवायांचा पूर्ववेध घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आणि प्रगत गुप्तचर माहितीची मोठी मदत होऊ शकते. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन ते […]
देशाची युद्धक्षमता वाढण्याच्या आणि सुधारण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या. अमेरिकेशी झालेल्या करारामुळे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने तसेच आण्विक, जैविक तसेच रासायनिक युद्धाच्या दृष्टीने सैनिकांना आवश्यक कपडे आता आपल्या देशात तयार होतील. त्याशिवाय जपानकडून आपल्याला पाणबुड्यांचे संशोधन आणि निर्मिती यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. त्याशिवाय आपण स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी ५’ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी […]
अजून एका तरुण जो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याकरिता इराककडे जाण्याच्या वाटेवर होता, त्याला आपल्या गुप्तहेर संस्थांनी हैद्राबाद विमानतळावर रोखले. कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये जाण्याकरिता पळून गेले होते. त्यामधला एक तरुणाने २६ जानेवारीला स्फ़ोटक भरलेल्या कारने भारतात अमेरिकन राष्ट्रपतींवर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली. हे सगळे ऑनलाईन जिहादला बळी पडले होते. त्यामुळे इंटरनेटवर किंवा ऑनलाईन […]
जम्मू –काश्मीर, पंजाब आदी सीमावर्ती राज्यांत घुसखोरांबरोबरच शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करून तेथे अशांतता माजविण्याची व तरुण पिढी बरबाद करण्याची कुटिल खेळीही पाकिस्तान खेळत आहे. हा गंभीर धोका ओळखून त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आणि राज्य व केंद्राने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. आपल्या देशात इस्लामी दहशतवादासोबतच नार्को […]
पोरबंदरच्या प्रकरणानंतर ज्याप्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला जात आहे आणि वाहिन्यांवरून ज्याप्रकारे चर्चा केली जात आहे, विधाने केली जात आहेत, त्या वाचताना-पाहताना अनेक प्रश्न उपस्थित होतात प्रत्येक गोष्टी कायद्याच्या आधारे सिद्ध करण्यासाठी घाई कशाला हवी ? आपल्या सुरक्षा यंत्रणांवर आपण विश्वास ठेवणार आहोत की नाही? ? की आपला पाकिस्तानहून आलेल्या बातमीवर अधिक विश्वास आहे ? आणि जर तसा असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे शत्रूराष्ट्राच्या बाजूने झुकणार्यावर आणि त्यांची भलामण करणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटले दाखल करण्याची गरज आहे. […]
जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात. दिवसा नोकरी रात्री आयएसआयएस’साठी काम इस्लामिक स्टेट इन इराक ऍण्ड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचे ट्विटर अकाऊंट बंगळुरू येथून चालविणार्या मेहदी मसरूर बिस्वास या तरुणाच्या मुसक्या कर्नाटक पोलिसांनी आवळल्या. आपण […]
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच सहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांचा फेरआढावा घेण्यात आला. मुंबईसारख्या शहरामध्ये घुसण्यात दहशतवाद्यांना यश आले तरीही त्यांच्याशी लढाई करण्यासाठी किंवा त्यांचा खात्मा करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडोज् कायमचे नियुक्त करण्यात आलेले आहेत. हे कमांडोज भारतीय सैन्याचे सर्वोत्कृष्ट कमांडो म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच मुंबईत जर भविष्यात काही दहशतवादी शिरले […]
मागच्या आठवड्यात संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे, आता संरक्षण मंत्री पद गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आले.अरूण जेटली गेले सहा महिने संरक्षण मंत्री आणि अर्थ मंत्री हा कार्यभार सांभाळत होते. संरक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय ही दोन्ही खाती एकाच व्यक्तीकडे असणे योग्य नव्हते. […]