नवीन लेखन...

उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर

उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी गुर्लहोसूर येथे झाला.

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे धारवाड व कलादगी येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांनी अठराव्या वर्षी मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचा अभ्यास पूणे केला. पुढे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम चित्रकला-शिक्षक व नंतर बाष्प-अभियांत्रिकीचे अध्यापक. १८९७ मध्ये ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडवा कापणीयंत्र, लोखंडी नांगर वगैरे वस्तूंच्या उत्पादनास प्रारंभ केला. १९१० साली औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्जन व निर्जल माळावर `किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. हया कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषिअवजारांचे उत्पादन सुरू झाले. भांडवल करण्यात आले. तीमध्ये विविध प्रकारचे हात पंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, लेथ इत्यादींचे उत्पादन होऊ लागले.

औद्योगिक कारखाने चालविण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसताही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केल्या. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. विश्वासू व कर्तबगार सहकारी निर्माण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव आणि वस्तूच्या उत्कृष्ट गुणवर्त्तेचा आग्रह. कणखर शिस्त, पद्धतशीर काम, जगभर आपला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा, हे त्यांचे वर्तनसूत्र होते. किर्लोस्करवाडीची रचना करताना `कॅउबरी’ किंवा `नॅशनल कॅश रजिस्टर’ ह्या सुविख्यात पश्चिमी कंपन्यांनी बांधलेल्या औद्योगिक वसाहती त्यांच्या नजरेसमोर होत्या. कारखान्याचे स्वतःचे एखादे मासिक असावे, हीही त्यांची एक आधुनिक कल्पना होती. लक्ष्मणराव यांत्रिकीकरणाचे कट्‌टे क्षेत्रात शिरण्याची स्फूर्ती मिळाली. १९६९ साली भारत सरकारने लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी देशभर साजरी केली; त्या निमित्ताने टपाल खात्याने वीस पैशांचे एक तिकिटही काढले. १९३४-३८ मध्ये लक्ष्मणराव औंध संस्थानचे दिवाण होते. १९४५ मध्ये ते कारखान्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. १९५३ साली प्रथमच `मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्रीज’चे सन्माननीय सदस्यत्व लक्ष्मणरावांना देण्यात आले.

किर्लोस्कर उद्योगसमूहात पुढील कंपन्या आहेत:

(१) किर्लोस्कर ब्रदर्स लि.; (२) द म्हैसूर किर्लोस्कर लि. (१९४१); (३) किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लि. (१९४८-४९); (४) किर्लोस्कर ऑईल एंजिन्स लि. (१९४६); (५) एफ्‌. एच्‌. शूले जी. एम्‌. बी. एच्‌.-किर्लोस्कर ऑईल एंजिन्सची दुय्यम कंपनी, भातसडीच्या यंत्रोत्पदनात अग्रेसर; (६) किर्लोस्कर न्युमॅटिक कं. लि. (१९६२); (७) किर्लोस्कर कमिन्स लि. (१९६२); (८) किर्लोस्कर एसिआ लि. (१९६२); (९) किर्लोस्कर कन्सल्टंट्‌स लि. (१९६३); उद्योगधंद्यांबाबतच्या तांत्रिक, आर्थिक, व्यवस्थापन व विपणन यांविषयी सल्ला व मार्गदर्शन करणारी कंपनी; (१०) शिवाजी वर्क्स लि. – किर्लोस्कर ऑईल एंजिन्सची दुय्यम कंपनी; (११) किर्लोस्कर प्रेस- किर्लोस्कर ब्रदर्स लि.ची एक शाखा.

किर्लोस्कर व स्त्री ही मासिके आणि मनोहर हे साप्ताहिक किर्लोस्कर प्रेसतर्फे निघते.. वरील उद्योगांशिवाय गेल्या दोन-तीन वर्षांत ट्रॅक्टर व पेट्रोल एंजिने यांचे उत्पादन करणारे दोन कारखाने या समूहाने नव्याने उभारले आहेत. `किर्लोस्कर प्रतिष्ठाना’मुळे देशातील शंभरांहून अधिक छोट्या कारखानदारांना साह्य मिळाले आहे.

भारतातील चार राज्यांत पसरलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहात १८,००० हून अधिक लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डीझेल एंजिने व सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे ३६, ६५ व ४० टक्के उत्पादन किर्लोस्करांकडून होते. ह्या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन ६३ कोटी रूपयांचे आहे. जगातील साठ देशांत त्याची निर्यातपेठ आहे. किर्लोस्कर उद्योगसमूहात सेंट्रिफ्युगल पंप, व्हर्टिकल लेथ, स्लुइझ व्हॉल्व्ह्‌ज, शेंगा फोडण्याची यंत्रे, सील्ड कॉप्रेसर्स युनिट, मशीन टूल्स, विद्युत्‌मोटारी, ३ ते ८०० अश्वशक्तीची वॉटरकूल्ड डीझेल एंजिने, भातसडीची यंत्रे, एअर कॉंप्रेसर, रेफ्रिजरेशन कॉप्रेसर, स्विचगिअर, मोटर कंट्रोल गिअर, ट्रॅक्टर, कास्टिंग वगैरे यंत्रांचे उत्पादन होते. आता हा समूह तांत्रिक ज्ञानाचीही परदेशात निर्यात करू लागला आहे. फिलिपीन्स आणि मलेशिया ह्या देशांत अनुक्रमे वॉटरकूल्ड एंजिने आणि विद्युत्‌मोटारी ह्यांचे उत्पादन किर्लोस्करांच्या सहकार्याने होऊ लागले आहे. भारतातील औद्योगिकीकरणाच्या इतिहासात किर्लोस्कर घराण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन २६ सप्टेंबर १९५६ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2721 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..