नवीन लेखन...

बिन भांडवली किंवा अल्प भांडवली व्यवसाय

Business Without or Very Low Investment

उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.

1) पैशांचे भांडवल
2) वेळेचे भांडवल
3) मनुष्यबळाचे भांडवल

अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.

प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो. तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये मुल्याचा वेळ उपलब्ध असतो.

मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो.

वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी 2 लाख 60 हजार रुपये भांडवल आपोआप उपलब्ध हे असतेच. अर्थात या भांडवलाचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.

पूर्वी घरगुती शिकवण्या घेणे, कपडे शिवून देणे, खाद्यपदार्थ किंवापोळ्या करून देणे, पाळणाघर चालवणे यांसारखे अल्प भांडवलाचे व्यवसाय उपलब्ध होते;पण या प्रकारच्या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती.

आता असे व्यवसाय उपलब्ध आहेत की ज्याला पैशांच्या भांडवलाची गरज भासत नाही किंवा अत्यल्प भांडवलाची गरज भासते. यांना जास्त करून वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाची गरज भासते. तसेच या व्यवसायांना बर्‍यापैकी प्रतिष्ठा असते किंवा या व्यवसायात माणसे चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. हे व्यवसाय कोणते हे थोडक्यात बघू.

1) विमा प्रतिनिधीः-
भारतामधेविमा व्यवसाय हा अत्यंत वेगाने वाढणार्‍या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. यामधेआयुर्विमा (LifeInsurance) वसर्वसाधारण विमा (GeneralInsurance) हेदोन प्रकार येतात. आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे स्पर्धावाढली आहे. आता सर्वच विमा कंपन्यांना उच्च दर्जाच्या विमा प्रतिनिधींची गरज आहे.

2) म्युच्युअल फंड सल्लागारः-
म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवीन साधन उपलब्ध झाले असून, हा पण व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड सल्लागारांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.

3) विक्री प्रतिनिधीः-
हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री दुकानदारांमार्फत न करताविक्री प्रतिनिधींमार्फत करतात. विशेषतः आरोग्यविषयक उत्पादने करणार्‍या कंपन्याहा मार्ग अनुसरतात.

4) सामुपदेशक (Councilors):-
मोठ्या प्रमाणावर यांची गरज आहे.

5) प्रशिक्षक (Trainer) :-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना प्रशिक्षकांची गरज भासते. शिक्षक (Teacher) व प्रशिक्षक (Trainer) यात मोठा फरक आहे. प्रशिक्षक हा त्या क्षेत्रातील तज्ञ असावा लागतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा प्रशिक्षक होऊ शकेल पण तो हुतुतु, खोखो, आट्यापाट्या या खेळांचा प्रशिक्षक होऊ शकणार नाही पण शिक्षक होऊ शकेल

6) सल्लागार (Consultants):-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना सल्लागारांची गरज भासते.

असे अजुन पुष्कळ व्यवसाय आहेत.

सर्वसाधारणपणे ग्रामीण भागासाठी 10 वी पास व शहरी भागासाठी 12 वी पास असलेले व 18 च्या वर वय असलेले कोणीही स्त्री-पुरुष हा व्यवसाय करू शकतात. काही व्यवसायांमधे वयाची व शिक्षणाची अट नसते, तसेच अनुभवाची गरज नसते.कॉलेजमधे जाणारे विद्यार्थी, महिला, गृहिणी, तसेच निवृत्त झालेले लोक हा व्यवसाय करू शकतात. हा व्यवसाय ते पुर्ण वेळ (Full Time), अर्ध वेळ (Part Time) किंवा स्वतःच्या सवडीप्रमाणे केव्हाही करू शकतात.. तसेच नोकरी करणारे पण हे व्यवसाय करू शकतात.

यासाठी ऑफीस, दुकान, गोडाऊन वगैरेची गरज नसते.भांडवली गुंतवणुक जवळ जवळ नसते. इतर व्यापार्‍यांना ठेवावे लागतात तसे अनेक प्रकारचे हिषोब ठेवावे लागत नाहीत. बहुतेक आर्थिक व्यवहार हे कंपनी व ग्राहक यांचेमधे परस्पर होत असतात. विक्री प्रतिनिधींना फक्त कमीशन मिळत असते किंवा फी मिळत असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने हे व्यवसाय फार सोपे असतात.

ज्यांना लोकांना भेटायची आवड आहे, लोकांशी संवाद साधणे आवडते, उत्तम सादरीकरणाचे कौशल्य आहे, लोकांना आपले म्हणणे पटवण्याची कला आहे (Convincing Power) ते लोक या व्यवसायात यशस्वी होतात असे आढळून आले आहे.

तरी मराठी लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा व उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करावे हीच इच्छा व अपेक्षा!

उल्हास हरी जोशी
मोः-9226846631

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

5 Comments on बिन भांडवली किंवा अल्प भांडवली व्यवसाय

  1. आपण दिलेली माहिती खूप छान आहे,मी एक बारावी पास विद्यार्थी आहे मला एक एकर 25गुंठे शेती आहे, कोरड वाहू माझं समोरील शिक्षण हे कृषी विभागातूनच होत आहे, माझी शेती गावा शेजारी असल्यामुळे मला दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे,ती प्लिज सर मला कळवा
    वैभव भालेराव
    रा_धुमका ता:वाशिम . जी:वाशिम
    पोस्ट:धुमका

    • आपला विचार उत्तम आहे. दुग्ध व्यवसायाबरोबरच हल्ली गोमुत्राला पण फार महत्व प्राप्त झाले आहे. गोमुत्र आणि गाईचे शेण याला पण चांगली मागणी असते.

Leave a Reply to jambhekar a.v. Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..