बॉलीवूडमधील मराठी चेहरा रितेश देशमुख

बॉलीवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी झाला.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा तो मुलगा.

बॉलीवूडमध्ये वेगळी उंची गाठल्यानंतर मराठमोठ्या रितेशने मराठी चित्रपट सृष्टीकडे वळून ‘लयभारी’ पदार्पण केले.

चित्रपटात ‘अँग्री यंग मॅन’ लूकसोबत या चित्रपटाला रितेशने दुहेरी भूमिकेची किनार दिली आणि चाहत्यांना ‘लयभारी’ ट्रीट दिली. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडीस काढले. रितेश देशमुख यांनी मस्ती, हाऊसफुल आणि मराठी लय भारी यासारखी सिनेमे दिले. मात्र काही सिनेमांनी रितेश देशमुखला प्रोफेशनल आयुष्याबरोबरच पर्सनल आयुष्यात देखील खास मदत केली.

रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले.

रितेश-जेनेलियाची प्रेमकथा सर्वांनाच माहित आहे. ३ जानेवारी २०१२ रोजी जेनेलिया रितेश देशमुखबरोबर विवाहबद्ध झाली. रितेश आणि जेनेलियाचे लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

प्रत्येक इव्हेन्ट व इतर कार्यक्रमांना एकत्रित उपस्थित राहताना एकमेकांबद्दलची काळजी आणि दोघांमधील प्रेमाचे नाते लग्नात बदलल्यानंतर आणखी बळकट झाल्याचे वारंवार दिसून आले. जेनेलियाच्या गर्भवती असताना रितेशने तिची घेतलेली काळजी, प्रेम याचं रितेशच्या चाहत्यांना अप्रूप वाटलं.

बॉलिवूड अभिनेत्री असण्याबरोबरच जेनेलिया एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे. बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा काम केले आहे. जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड सिनेमांमध्ये जेनेलिया झळकली आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2284 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..