बंदोबस्तातलं स्वातंत्र्य..

आपला ७२वा स्वातंत्र्य दिवस नुकताच उत्साहानं, देशभरात साजरा करण्यात आला. शाळेतल्या मुलांनी शाळेत जाऊन प्रभात फेरी काढुन, ध्वजाला वंदन करून, शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात जाऊन स्वातंत्र्यदिवस साजरा केला. आपण देशाभिमानी आहोत याची पावती देण्याचा प्रत्येकाने हा प्रयत्न केला असेच म्हणावे लागेल. कारण… १४ ऑगस्टला येणाऱ्या बातम्यांमध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचा वारंवार उल्लेख येत होता. दिल्ली, मुंबई सारख्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असल्याचे सांगितले जात होते. काय कारण बरं असेल… या गोष्टी मागे…

तुम्ही म्हणाला हा काय प्रश्न झाला.. उत्तर अगदी सोप्पय. दहशतवादी कृत्यांचा संशय असल्याने, त्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता जास्त असल्याने सुरक्षेची ही काळजी घेणं योग्यच होतं नाही का..? बरोबरच आहे हे उत्तरही.. पण ते फार वरवरचं उत्तर आहे, कोरडं समाधान करणारं.. खरं उत्तर आपल्या आंत दडलेलं आहे. मी निर्भयपणे समाजात वावरतो काय.. दिवसभरात ज्या काही गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहतो.. त्यातील चांगल्या सोडुन द्या पण ज्यांच्याबद्दल संशय बळावू शकेल अशा गोष्टी आपण संबंधीत यंत्रणेपर्यंत अर्थात पोलिसांपर्यंत पोहोचवतो का..? आपण चाकरमाने असु तर सकाळी दहाला ऑफिसला निघतो. संध्याकाळी परत येतो घरी. या दिवसभरात आपल्या कानावर कोणतीच वाईट गोष्ट, संशयास्पद हालचाली जाणवत नाही का हो..? जर जाणवत असतील तर त्या आपण संबंधितांना सांगतो का? बर असेही नाही की रोजच काही तरी संशयास्पद गोष्टी आढळतील.. पण जेव्हा केव्हा आपल्याला या गोष्टी आढळतात तेव्हा तरी आपण आपले कर्तव्य पार पाडतो का? उत्तर अर्थातच नकारार्थीच आहे. अहो साधं रस्त्याने जाताना झालेला अपघात आपण संबंधितांना सांगत नाहीत.. काही महाभाग तर अपघात मोबाईलमध्ये शुट करण्यातच स्वत:ला धन्य मानतात.. असो..

आपण ज्या कॉलनीत राहतो तेथे आपल्या शेजारी कोण रहायला आलेला आहे, याची देखील फारशी माहिती नसते आपल्याला. शेजारी राहणारा काय उद्योग करतो हे आपल्याला काहीतरी घडल्यानंतरच कळते.. इतके आम्ही सजग असतो.. जागरूक असतो. जागरूक नागरिक असण्याची ही लक्षणं आहेत का..?

अशी सगळी पार्श्वभूमी आपली असल्यावर स्वातंत्र्य दिवस मुक्तपणे, मोकळ्या वातावरणात, निर्भय होऊन साजरा कसा केला जाऊ शकतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. संसार सोडुन स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभागी झाले. मोठा त्याग करून या मंडळींनी स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलं. त्याचा आदर करणं आपल्या हाती आहे, मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं, ते जपणं आपल्या हाती आहे. की सहजा सहजी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं म्हणून त्याची किंमत आपल्याला कळत नाही…! देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी नाही, सैन्यदलाकडे ती जबाबदारी देऊन आपण मोकळे पणानं कसे काय वागू शकतो. आपल्या देशाबद्दल आपली काहीच जबाबदारी नाही का..? या देशाचा प्रत्येक माणुस, प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. सैनिक जसा देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन उभा असतो, तसे नागरिकांनी देखील डोळ्यात तेल घालुन जागे असले पाहिजे. तेव्हा कुठे बंदोबस्तातले हे स्वातंत्र्य मोकळा श्वास घेऊ शकेल… नाही का…

— दिनेश दीक्षित

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 21 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…