नवीन लेखन...

आवड तुमची अंदाज आमचा

न्याहरीची तऱ्हा या नावाने कविता पाठवली होती. आणि अनेकांच्या प्रतिसादांतून आम्ही काही स्वभावाचा अंदाज बांधला आहे. आर्थात अंदाज म्हणजे अगदी खरा किंवा चूक असा नसतो म्हणून फार मनावर घेऊ नये आणि तसेही मी फार मोठी मानसशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे विनंती आहे की वाचा आणि सोडून द्या. आहे काय नाही काय. पण अंदाज यासाठी गाढा अभ्यास करावा लागतो? म्हणून आता मी जे अंदाज बांधले आहेत ते पडताळून पाहण्याची गरज नाही.
मी जे पदार्थ व त्याचा गुणधर्म सांगितले होते. त्यावरुन.
1)दोसा: याची पसंती जास्त दिसली नाही म्हणून अंदाज आमचा अशी माणसं आटापिटा करत नाहीत आणि दोसा जसा तसेच मनमोकळ्या मनाची असतात.
2)इडली: याला पसंती दिली आहे. पण मी लिहिले होते की साथीदार सांबार नसला की ती फुगते. तसेच इडली आवडणाऱ्याला आपल्या जोडीदाराची साथ हवी असते व नसेल तर रुसतात. आणि त्यात एक प्रकार म्हणजे नसेल तरी साथ आहे त्यात गोड मानून घेण्याचा स्वभाव. अंदाज आमचा.
3) आप्पे: याला पसंती दिली नाही. कारण कळत नाही. कदाचित आवड किंवा करणाऱ्यांना सवड नसेल तर एकाने सांगितले की मी खाल्ले नाही पण या पुढे खाऊन बघेन. अशी माणसं प्रामाणिक पणे चूक मान्य करतात. व चूक सुधारली जाईल असे कबूल करतात आमचा अंदाज.
4)उकड: याच्या कडे तर कुणीही ढुंकूनही पाहिले नाही. बरोबर आहे ना. दंताजीचे ठाणे अजून उठलेले नाही. आणि वृद्धही नाहीत आजारी पडू नये म्हणून खूप काळजी घेतली असेल. गिळायची सवय नाही. छान आहे ना?
5) उपमा: हे पण कुणीही आवडते असे सांगितले नाही यावरून फार धडपड दगदग करावी लागते म्हणून त्या वाटेला जात नाहीत अशा प्रकारची वृत्ती. सहजपणे मिळाले तर हरकत नाही असाही स्वभाव. अशा उपमाला उपमा नाही. अंदाज आमचा
6) शिरा: यात आमचे अंदाज दोन प्रकारचे आहेत. गोड खाण्याची आवड आहे म्हणजे गोड बोलून काम करवून घेतात. गोड गोड बोलतात. त्यामुळे मन दुखावले जात नाही. किंवा देवाचा प्रसाद म्हणून खातात पापपुण्याचा विचार करतात आमच्या अंदाजे.आणि शाही खाणे आवडते म्हणजे श्रीमंती खाणे राहणे याची आवड असेल.
7) कांदा पोहे: याची आवड असणारी व्यक्ती आगतस्वागत करणारी. आणि मैत्री जोडून टिकणारी असते. आळस करत नाहीत गरमागरम पोहे करून मन जिंकून घेतात.
खर तर न्याहरीचे खूप प्रकार आहेत आणि प्रांतनिहाय वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण सर्वसाधारण पणे हे पदार्थ प्रचलित आहेत म्हणून एवढेच दिले होते. पण काही जणांनी आणखीन काही पदार्थ सुचवलेले आहेत म्हणुन अंदाज आहे की एक केले की ते मुकाट्याने न खाता एक केले की दुसरेच सुचवतात. निर्णय स्थीर नाहीत.
आता फक्त दोन तीन शब्दात व्यक्त होणारे मनात काहीही असो छान छान म्हणतात. कुणालाही दुखवत नाहीत तटस्थ राहतात आणि सहभागी आहोत असे दाखवतात.
सगळेच आवडले पदार्थ आहेत असं म्हणणारी माणसं आहे त्यात गोड मानून घेणारी असतात कुठेही गेले तरी कोणाला जड जाईल असे वागत नाहीत. सगळ्यात मिळून मिसळून राहतात. आणि मुख्य म्हणजे खरे खवैये असतात.
हो एक विसरले ते म्हणजे कविता आवडली याची अर्थ असा की ही माणसं रसिक व जीवनाचा आस्वाद घेणारी असतात. म्हणजे आपण सगळेच चहा घेतो सकाळी पण अशी माणसं चहा घेता घेता पेपर वाचणे जास्त पसंत करतात. मस्त पैकी गरमागरम चहा. गॅलरीत खुर्ची वर बसून पेपर वाचत वाचत एकेक घोट. होय ना. अगदी तसेच पदार्थाचा आस्वाद व कविता आवडली. म्हणून पदार्थ व कविता दोन्ही बाजूला पसंती दाखवली आहे.
सगळ्यांना विनम्र विनंती आहे की शेवटी हा अंदाज आमचा आणि आवड तुमची आहे. त्यामुळे कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. चूक भूल द्यावी घ्यावी.
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..