नवीन लेखन...

अलीकडे

अलीकडे, काळ्या पाषाणखंडाचा मला हेवा वाटू लागलाय कारण- पाषाणाला ह्र्दय नसते- विदीर्ण व्हायची भीती नसते, पाषाणाला मेंदू नसतो- सडून जायची काळजी नसते… अलीकडे, अग्नीचाही मला हेवा वाटू लागलाय कारण- अग्नीला स्वत:चे घर नसते- जळून जायचे भय नसते, अग्नीला स्वत:चा देह नसतो- राख व्हायची चिंता नसते… अलीकडे- — विष्णू गोपाळ वडेर

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..