नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आकाशवाणी पुणे केंद्र

२ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे… !!! सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली. आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती […]

गदीमा उर्फ ग.दि.माडगूळकर

गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या […]

मजरुह सुलतानपुरी

भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला. आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी […]

एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन

“महान” या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी.बर्मन सर्वार्थाने दादाच होते. त्यांचा जन्म १ आक्टोबर १९०६ रोजी झाला. केवळ १०० हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण मेलडी, ओर्केस्ट्रेशन, चाली, शब्दांची आणि गायकांची अचूक निवड या गोष्टींमुळे भारंभार संगीत देणाऱ्या इतर संगीतकारांपेक्षा ते खुप वेगळे होते. मणीपूरच्या राजघराण्यातले असल्याने वागण्या-बोलण्यात एक प्रकारची हुकुमत आणि […]

सदाबहार गाण्यांचे संगीतकार हेमंत भोसले

१९७० ते १९८५ या कालावधीत त्यांनी संगीतकार म्हणून संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा योगी, टॅक्सीी टॅक्सीन, बॅरिस्टर, तेरी मेरी कहानी, आया रंगीला सावन अशा काही हिंदी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. “शारद सुंदर चंदेरी राती‘, “बाळा माझ्या नीज ना‘, “मी ही अशी भोळी कशी गं‘, “जा जा जा […]

रणबीर कपूर

रणबीर कपूर हा हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यू यॉर्कच्या ‘लि स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘साँवरीया’ चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही […]

महान गायक महेंद्र कपूर

मनोज कुमार यांच्या “उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन्‌ प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं “मेरे देश की धरती‘… हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा […]

ठुमरी विश्वाची सम्राज्ञी शोभा गुर्टू

शोभा गुर्टू ह्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना ‘ठुमरी सम्राज्ञी’ म्हणून नावाजले होते. शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर […]

ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले

ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा […]

एमबीए पदवीधर असणारी पहिली महिला सरपंच – छवी राजावत

मुंबईमधील मल्टीनॅशनल कंपनीत तगड्या पगाराची नोकरी सोडून राज्यस्थानच्या टोंक जिल्यातील सोढा पंचायतीची सरपंच छवी राजावत यांनी पूर्ण पंचायतीला आदर्श पंचायतमध्ये परिवर्तीत केले आहे. गावाच्या विकासासाठी त्या सरकारी पैशांवर निर्भर न रहाता, खाजगी क्षेत्रातून गुंतवणूकीची व्यवस्था करीत आहे. सोढा मध्ये पाणी, वीज, रस्त्यांच्या सुविधांचा अभाव या हद्दपार झालेल्या गोष्टी आहेत आता इथला ऐरणीचा विषय म्हणजे गावात बँक, एटीम, सौर उर्जा, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सोय या व्यतिरिक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एखाद्या जागेची सोय. दिल्लीतील कॉलेज मधून आलेल्या मुलींशी गावातील स्त्रिया व मुली, मासिक पाळी व प्रसूती या मोकळेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांवर चर्चा करू लागल्या. […]

1 295 296 297 298 299 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..